

घर बांधताना प्रत्येक खोलीची जागा आणि दिशा ठरवताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. त्यात किचनचाही समावेश असतो. वास्तुशास्त्रानुसार, किचनला घरातील महत्त्वाची जागा मानलं जातं. कारण याच ठिकाणी संपूर्ण कुटुंबासाठी जेवण तयार केलं जातं.
किचनमध्ये गॅस, शेगडी आणि इतर सामान कुठे ठेवायचं याकडे अनेकजण लक्ष देतात. पण किचनचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा, याचाही वास्तुशास्त्रात विचार केला जातो. तुम्ही नवीन घर बांधत असाल किंवा जुन्या किचनमध्ये काही बदल करण्याचा विचार करत असाल, तर दरवाजाची दिशा ठरवताना काही गोष्टी लक्षात ठेवू शकता.
वास्तुशास्त्राचे तज्ज्ञांच्या मते, किचनच्या दरवाजाची दिशा ठरवताना घराची संपूर्ण रचना आणि किचन नेमकं कुठे आहे, हे पाहणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार, किचनचा दरवाजा पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेला असणं शुभ मानलं जातं. पण प्रत्येक घराची रचना वेगळी असते. त्यामुळे केवळ दिशा पाहून निर्णय घेऊ नये.
वास्तूशास्त्रात पूर्व दिशा ही सूर्याची दिशा मानली जाते. या दिशेला सकारात्मक ऊर्जेशी जोडलं जातं. त्यामुळे किचनचा दरवाजा पूर्व दिशेला असेल तर तो चांगला पर्याय मानला जातो. विशेष म्हणजे सकाळच्या वेळी सूर्याचा प्रकाश किचनमध्ये येत असेल तर किचन अधिक मोकळे आणि उजळ दिसते.
वास्तुशास्त्रानुसार, किचनचा दरवाजा उत्तर दिशेला असणेही योग्य मानलं जातं. घराची रचना अशी असेल की किचनचा दरवाजा उत्तर दिशेला सहज करता येऊ शकतो, तर या दिशेचाही विचार करता येतो.
काही घरांमध्ये जागा कमी असल्यामुळे किंवा घराच्या नकाशानुसार, किचनचा दरवाजा पश्चिम दिशेला ठेवावा लागतो. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, काही परिस्थितींमध्ये पश्चिम दिशेचा दरवाजाही योग्य मानला जातो. त्यामुळे किचनचा दरवाजा पश्चिम दिशेला असल्यास लगेच चिंता करण्याची गरज नाही. कारण किचनमध्ये इतर वस्तूंची मांडणी कशी केलीये हेही तितकेच महत्त्वाचं असतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.