Microwave Placement: किचनमध्ये मायक्रोवेव्ह कोणत्या दिशेला ठेवावा? चुकीच्या ठिकाणी ठेवणं पडेल महागात, वास्तूनुसार जाणून घ्या योग्य दिशा

Microwave Vastu Tips: किचनमध्ये मायक्रोवेव्ह ठेवताना योग्य दिशेची निवड करणं महत्त्वाचं मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण-पूर्व किंवा पूर्व दिशा मायक्रोवेव्हसाठी योग्य आहे. तर पश्चिम आणि उत्तर दिशेला मायक्रोवेव्ह ठेवणं टाळावं, असा वास्तुतज्ज्ञांचा सल्ला आहे.
Microwave Placement
Microwave Placementsaam tv
Published On: 

आजकाल प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात अनेक आधुनिक उपकरणं पाहायला मिळतात. फ्रिज, टोस्टर, मिक्सर, गॅस शेगडी, वॉटर प्युरिफायर आणि मायक्रोवेव्ह अशा वस्तू किचनचा महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. पण या वस्तू किचनमध्ये ठेवताना योग्य जागेची निवड करणंही गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक वस्तू कोणत्या दिशेला ठेवावी याबाबत काही नियम सांगण्यात आलेत. त्यानुसार, किचनमधील वस्तू योग्य दिशेला ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, असं मानलं जातं.

स्वयंपाकघरातील वस्तू व्यवस्थित ठेवण्यासोबतच त्यांची योग्य दिशा निवडणंही महत्त्वाचं आहे. असं केल्यास किचनमधील वास्तुदोष दूर राहण्यास मदत होते, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. मग घरातील मायक्रोवेव्ह नेमका कोणत्या दिशेला ठेवावा? वास्तूतज्ज्ञांनी आपल्याला याबाबत माहिती दिली आहे.

Microwave Placement
Bathroom Door Design: बाथरूमचा दरवाजा पाण्यामुळे खराब होतोय? classy look देणारे-टिकणारे हे 3 पर्याय ठरतील बेस्ट ऑप्शन

वास्तुशास्त्रानुसार मायक्रोवेव्ह योग्य दिशेला ठेवा

अनेकांना प्रश्न पडतो की, मायक्रोवेव्ह ठेवताना दिशेचा विचार करणं गरजेचं का आहे? वास्तुशास्त्रानुसार, घरातील स्वयंपाकघर वास्तुदोषांपासून मुक्त असणं महत्त्वाचं मानलं जातं. वास्तुदोषांमुळे घरात आजारपण, दुःख आणि पैशांचं नुकसान होऊ शकतं, अशी मान्यता आहे. त्यामुळे किचनमधील मायक्रोवेव्हसारखी उपकरणंही योग्य दिशेला ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

Microwave Placement
Kitchen Vastu Tips: किचनमध्ये फ्रीज आणि झाडू कुठे ठेवताय? योग्य दिशा माहितीये का? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

मायक्रोवेव्ह ठेवण्यासाठी कोणती दिशा योग्य?

वास्तुशास्त्रानुसार, मायक्रोवेव्ह ठेवण्यासाठी दक्षिण-पूर्व दिशा सर्वात योग्य मानली जाते. या दिशेला मायक्रोवेव्ह ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, असं सांगितलं जातं. याशिवाय पूर्व दिशेलाही मायक्रोवेव्ह ठेवू शकता.

या दोन दिशांना मायक्रोवेव्ह ठेवणं टाळा

मायक्रोवेव्ह ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती, हे समजलं. पण वास्तुशास्त्रानुसार काही दिशांना मायक्रोवेव्ह ठेवणं टाळायला हवं.

  • पश्चिम दिशा- या दिशेला मायक्रोवेव्ह ठेवणं योग्य मानलं जात नाही. असं केल्याने घरातील सुख-समृद्धी कमी होते, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे.

  • उत्तर दिशा- उत्तर दिशेलाही मायक्रोवेव्ह ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

Microwave Placement
Kitchen door direction: किचनचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा? घर बांधताना वास्तुशास्त्रातील हे नियम लक्षात ठेवा

त्यामुळे किचनमध्ये मायक्रोवेव्ह ठेवताना दक्षिण-पूर्व किंवा पूर्व दिशा निवडावी तर पश्चिम आणि उत्तर दिशा टाळाव्यात, असा वास्तुतज्ज्ञांचा सल्ला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.