Bathroom Door Design: बाथरूमचा दरवाजा पाण्यामुळे खराब होतोय? classy look देणारे-टिकणारे हे 3 पर्याय ठरतील बेस्ट ऑप्शन

Wooden Bathroom Door: बाथरूममधील ओलाव्यामुळे लाकडी दरवाजा खराब होतोय? मग WPC, uPVC, अॅल्युमिनियम आणि स्टीलचे पर्याय जाणून घ्या. या दरवाजांचे फायदे, टिकाऊपणा, देखभाल आणि बजेट लक्षात घेऊन बाथरूमसाठी योग्य दरवाजा कसा निवडावा, ते समजून घ्या.
Bathroom Door Design
Bathroom Door Designsaam tv
Published On: 

घर बांधताना किंवा घराचं renovation करताना अनेकजण प्रत्येक खोलीसोबत बाथरूमलाही लाकडी दरवाजा बसवतात. पण काही दिवसांनी हाच दरवाजा डोकेदुखी ठरू शकतो. कारण बाथरूममध्ये सतत पाण्याचे शिंतोडे उडतात आणि ओलावाही कायम असतो. त्यामुळे लाकडी दरवाजा खालच्या बाजूने खराब होऊ लागतो. तसंच त्याला वाळवी लागण्याची शक्यताही वाढते.

ही समस्या टाळायची असेल तर बाथरूमसाठी लाकडी दरवाजाऐवजी इतर पर्याय निवडणं फायदेशीर ठरू शकतं. इंटिरिअर तज्ज्ञांनी यासाठी डब्ल्यूपीसी (WPC), यूपीव्हीसी (uPVC), अॅल्युमिनियम आणि स्टील अशा तीन प्रकारच्या दरवाजांचे पर्याय सुचवलेत. हे दरवाजे दिसायला लाकडासारखे सुंदर असतात. पण पाणी आणि ओलाव्यामुळे ते लवकर खराब होत नाहीत. चला तर जाणून घेऊया या दरवाजांचे फायदे आणि ते बजेटमध्ये बसणारे आहेत का?

Bathroom Door Design
Vastu Tips: फ्रीज किचनमध्ये ठेवणं शुभ की अशुभ? नेमका कुठे ठेवावा? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

बाथरूमसाठी लाकडी दरवाजा का टाळावा?

बाथरूममध्ये दिवसभर पाण्याचा वापर होत असतो. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच ओलावा असतो. लाकूड पाणी शोषून घेते. अशा वातावरणात लाकडी दरवाजावर सतत पाण्याचे शिंतोडे उडाले किंवा वाफ लागली तर तो खालच्या बाजूने खराब होऊ लागतो. काही काळाने लाकूड सडण्याचीही शक्यता असते. याशिवाय ओलसर जागी वाळवी लागण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे बाथरूमसाठी लाकडी दरवाजा बसवण्यापेक्षा पाणी आणि ओलावा सहन करू शकणारा पर्याय निवडणं अधिक योग्य ठरतं.

डब्ल्यूपीसी दरवाजा ठरेल चांगला पर्याय

सध्या बाथरूमसाठी डब्ल्यूपीसी म्हणजेच वुड प्लास्टिक कंपोझिटपासून बनवलेल्या दरवाजांना पसंती दिली जात आहे. हे दरवाजे दिसायला लाकडासारखे असतात. त्यामुळे घराच्या इंटिरिअरला छान आणि महागडा लुक मिळतो.

या दरवाजांचा फायदा म्हणजे पाण्यामुळे ते लगेच खराब होत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांना वाळवी लागण्याची भीतीही नसते. तुमच्या बजेटनुसार यामध्ये स्वस्त आणि महागडे असे दोन्ही प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे कमी खर्चात चांगला दरवाजा हवा असेल तर डब्ल्यूपीसीचा विचार करू शकता.

यूपीव्हीसी आणि अॅल्युमिनियमचे दरवाजे

घराच्या खिडक्यांसाठी तुम्ही यूपीव्हीसी किंवा सिस्टम अॅल्युमिनियमचा वापर केला असेल, तर बाथरूमसाठीही याच प्रकारचा दरवाजा बसवू शकता. हे दरवाजे मजबूत असतात आणि बराच काळ टिकतात. पाणी किंवा ओलाव्यामुळे ते सहज खराब होत नाहीत. याशिवाय लाकडाप्रमाणे ते फुगत नाहीत आणि ते गंजण्याचा धोकाही नसतो. या दरवाजांची स्वच्छता आणि देखभाल करणंही सोपं असतं. त्यामुळे रोजच्या वापरासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Bathroom Door Design
Bathroom mirror cleaning: आरशावरचे हट्टी डाग कसे काढाल? या 5 टीप्सने होईल आरसा होईल चकचकीत

स्टीलचा दरवाजा

तुमचं बजेट चांगलं असेल आणि तुम्हाला खूप वर्षे टिकणारा दरवाजा हवा असेल तर स्टीलचा दरवाजा निवडू शकता. स्टीलचे दरवाजे मजबूत आणि टिकाऊ असतात. पाणी, ओलावा आणि बदलत्या हवामानाचा त्यांच्यावर सहज परिणाम होत नाही. त्यामुळे वारंवार दरवाजा बदलण्याची गरज पडत नाही. एकदा चांगल्या दर्जाचा स्टीलचा दरवाजा बसवला तर तो अनेक वर्षे वापरता येऊ शकतो.

दिसायला लाकडासारखे, पण डिझाइनमध्येही सुंदर

अनेकांना असं वाटतं की लाकडी दरवाजाऐवजी दुसऱ्या साहित्याचा दरवाजा बसवला तर तो घराच्या इंटिरिअरला शोभणार नाही. पण आता तसं नाहीये. डब्ल्यूपीसी, यूपीव्हीसी आणि स्टीलचे दरवाजेही वेगवेगळ्या आधुनिक डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये लाकडासारखा रंग आणि आकर्षक फिनिशिंग मिळतं. त्यामुळे घराच्या सजावटीशी जुळणारा दरवाजा निवडता येतो. हे दरवाजे बाथरूमला तर सुंदर लुक देतातच शिवाय संपूर्ण घराच्या इंटिरिअरमध्येही छान दिसतात.

Bathroom Door Design
Vastu Shastra For Mirror: घरात आरसा कोणत्या भिंतीवर लावावा? 'या' ठिकाणी चुकूनही लावू नका, वास्तुशास्त्रात सांगितलेत नियम

पैसे आणि वेळ वाचेल

घर बांधताना बाथरूमच्या दरवाजाची निवड करताना थोडा विचार करणं गरजेचं आहे. कारण दरवाजा बसवल्यानंतर काही दिवसांतच तो खराब झाला तर पुन्हा खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे लाकडी दरवाजाऐवजी डब्ल्यूपीसी, यूपीव्हीसी, अॅल्युमिनियम किंवा स्टीलचा पर्याय निवडल्यास भविष्यातील अनेक अडचणी टाळता येऊ शकतात. दरवाजा खराब होणं, ओलाव्यामुळे लाकूड सडणं, वाळवी लागणं आणि वारंवार दरवाजा बदलणं या समस्यांपासून बचाव होऊ शकतो. योग्य दरवाजा निवडल्यास तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचू शकतात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.