Vastu Tips: फ्रीज किचनमध्ये ठेवणं शुभ की अशुभ? नेमका कुठे ठेवावा? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

Fridge Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात फ्रिज कोणत्या दिशेला ठेवावा? फ्रिजचा दरवाजा कोणत्या दिशेला उघडावा आणि त्याच्या वर कोणत्या वस्तू ठेवू नयेत? जाणून घ्या किचनमध्ये फ्रिज ठेवण्यासंबंधीचे वास्तुशास्त्रातील नियम आणि महत्त्वाच्या गोष्टी.
Vastu Tips
Vastu Tipssaam tv
Published On: 

वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवावी, याबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. अनेकांना वाटतं की वास्तुशास्त्राचा संबंध फक्त घराच्या दिशा, बेडरूम किंवा देवघराच्या जागेशी असतो. पण असं नसून घरात असलेल्या प्रत्येक वस्तूची जागाही महत्त्वाची मानली जाते.

आपल्या आजूबाजूच्या वस्तूंचा आपल्या जीवनावर परिणाम होतो असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. त्यामुळे घरातील वस्तू योग्य ठिकाणी ठेवणं गरजेचं मानलं जातं. यामध्ये फ्रिजचाही समावेश होतो. घरात फ्रिज कोणत्या दिशेला ठेवावा आणि त्याच्या वर कोणत्या वस्तू ठेवू नयेत याबाबत वास्तुशास्त्रात काही नियम सांगितलेत.

Vastu Tips
Refrigerator Placement: किचनमध्ये फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

किचनमध्ये फ्रिज ठेवावा की नाही?

सहसा प्रत्येक घरात फ्रिज किचनमध्येच ठेवला जातो. परंतु काही घरांमध्ये जागा कमी असल्यामुळे किंवा सोयीसाठी फ्रिज किचनच्या बाहेरही ठेवला जातो. वास्तुशास्त्रानुसार, फ्रिज ठेवण्यासाठी किचन ही योग्य जागा मानली जाते. पण फ्रिज ठेवताना योग्य दिशा निवडणंही महत्त्वाचं आहे.

फ्रिज ठेवण्यासाठी कोणती दिशा योग्य?

वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये फ्रिज ठेवताना आग्नेय दिशा निवडावी. आग्नेय म्हणजेच दक्षिण-पूर्व दिशा. ही दिशा फ्रिज ठेवण्यासाठी सर्वात योग्य मानली जाते. कारण किचनमधील या कोपऱ्याचा संबंध अग्नी तत्त्वाशी असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय दक्षिण आणि पश्चिम या दिशांनाही फ्रिज ठेवण्यासाठी योग्य मानलं जातं. त्यामुळे फ्रिज ठेवताना या तीन दिशांचा विचार करावा.

Vastu Tips
Vastu Tips : रात्री कपडे धुण्याची सवय आहे? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या कपडे धुण्याची योग्य वेळ

फ्रिजचा दरवाजा कोणत्या दिशेला उघडावा?

फ्रिज ठेवताना त्याच्या दरवाजाची दिशाही लक्षात घ्यावी असं वास्तुशास्त्रात सांगितलंय. फ्रिजचा दरवाजा उघडल्यावर तो पूर्व दिशेकडे उघडेल अशा पद्धतीने फ्रिज ठेवावा. यामुळे घरात सुख आणि शांतता टिकून राहते, सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील सर्वजण आनंदी राहतात, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. त्याचप्रमाणे फ्रिजची स्वच्छताही नियमित करावी. आठवड्यातून किमान एकदा फ्रिज स्वच्छ करावा. त्यामुळे फ्रिजमध्ये घाण साचणार नाही.

फ्रिजच्या वर कोणत्या वस्तू ठेवू नयेत?

अनेक घरांमध्ये फ्रिजच्या वरच्या बाजूला वेगवेगळ्या वस्तू ठेवल्या जातात. पण वास्तुशास्त्रानुसार फ्रिजच्या वर वस्तू ठेवताना काळजी घेणं आवश्यक आहे. फ्रिजचा संबंध अग्नी तत्त्वाशी जोडला जातो. त्यामुळे त्याच्या वर पाण्याशी संबंधित कोणतीही वस्तू ठेवू नये, असं सांगितलं जातं. शिवाय फ्रिजच्या वर औषधं ठेवणंही टाळावं. त्यामुळे फ्रिजच्या वरच्या भागात वस्तू ठेवताना वास्तुशास्त्रातील या नियमांची काळजी घ्यावी.

Vastu Tips
Evening Diya Rules: दररोज संध्याकाळी घरी दिवा लावताय ना? नकळत होणाऱ्या या चुका टाळा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.