Brain health tips: विसर पडणं आणि लक्ष न लागणं वाढलंय? मेंदूचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी करा हे उपाय

Reduce stress naturally: योग्य झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि रिलॅक्सेशन तंत्रांचा अवलंब केल्यास मेंदू निरोगी राहतो. रोजच्या सवयींमध्ये छोटे बदल करून मानसिक आरोग्य सुधारता येऊ शकते.
Brain health tips
Brain health tipssaam tv
Published On

तणाव, अपुरी झोप आणि बदलती जीवनशैली यामुळे मेंदूशी संबंधित समस्यांमध्ये वाढ होताना दिसतेय. रोजच्या आयुष्यातील काही छोटे बदल तुमचा मेंदू सुरक्षित आणि मजबूत ठेवू शकतो. प्रत्येकाने आपल्या मेंदूच्या आरोग्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे.

वारंवार डोकेदुखी, चिंता, विसर पडणं, झोप न लागणं आणि सतत थकवा जाणवणं अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. व्यस्त जीवनशैली, जास्त वेळ मोबाईल-कॉम्प्युटरचा वापर, जेवणाच्या अनियमित वेळा आणि पुरेशी विश्रांती न घेणं यामुळे मेंदूवरील ताण वाढतो.

वाशीच्या न्यूईरा हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन डॉ. सुनील कुट्टी तरुणांमध्ये मानसिक थकवा आणि एकाग्रता कमी झाल्याचं दिसून येतंय. चिंता, मायग्रेन, लक्ष न लागणं आणि झोपेच्या समस्या पूर्वीपेक्षा अधिक पटीने वाढल्या आहेत. मेंदूवर सतत ताण येत असून त्याला पुरेशी विश्रांती मिळत नाही. म्हणूनच निरोगी भविष्यासाठी मेंदूची काळजी घेणे आवश्यक आहे.

Brain health tips
Periods after delivery: बाळाच्या डिलीव्हरीनंतर मासिक पाळी पुन्हा कधी सुरु होते?

मेंदू निरोगी राहण्यासाठी या उपायांचे पालन करा

पुरेशी झोप घ्या

दररोज ७–८ तास झोप घ्या. झोपेमुळे मेंदूतील पेशी दुरुस्त होतात, स्मरणशक्ती सुधारते आणि ताण कमी होतो. अपुरी झोप डोकेदुखी, चिडचिड, चिंता आणि आक्रमकपणा वाढवू शकते.

दररोज व्यायाम करा

जलद गतीने चालणं, योगा, नृत्य किंवा हलका व्यायाम हा मेंदूकडील रक्तपुरवठा वाढवतो आणि बुध्दी तल्लख ठेवतो. आठवड्यातून किमान ५ दिवस, दररोज ४५ मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.

मेंदूसाठी पोषक आहार घ्या

सुकामेवा, तेलबिया, मासे, अंडी, हिरव्या पालेभाज्या, बेरी फळं, हळद आणि तृणधान्याचा आहारात समावेश करा. साखरयुक्त आणि जंक फूडचे सेवन टाळा. केक, पेस्ट्री, डोनट्स, पिझ्झा, पास्ता, थंड पेये, आईस्क्रीम आणि कँडीजचे सेवन टाळा.

Brain health tips
Breast cancer India: महिलांनो वेळीच सावध व्हा! चुकीच्या सवयींमुळे 30 वयात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

रिलॅक्सेशन तंत्रांचा अवलंब करा

योग, ध्यान आणि खोल श्वसनाचे व्यायाम मन शांत ठेवतात, लक्ष केंद्रीत करायला मदत करतात आणि ताण कमी करतात.

स्क्रीन टाइम कमी करा

दर ४० मिनिटांनी मोबाईल किंवा लॅपटॉपपासून थोडा ब्रेक घ्या. वाढत्या स्क्रीन टाईममुळे डोळ्यांवर ताण येतो आणि मानसिक थकवा जाणवतो.

एकटेपणा दूर करणं

कुटुंबीय, मित्र किंवा सहकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधा यामुळे मन प्रसन्न राहील आणि एकटेपणा कमी करण्यासाठी मदत होईल .

Brain health tips
Liver tumor: लिव्हरमध्ये गाठ तयार झाल्यावर शरीर कसं सांगतं? ही महत्त्वाची 5 लक्षणं जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com