Periods after delivery: बाळाच्या डिलीव्हरीनंतर मासिक पाळी पुन्हा कधी सुरु होते?

Surabhi Jayashree Jagdish

मासिक पाळी

ज्या महिला केवळ बाळाला स्तनपान करतात, त्यांना मासिक पाळी लगेच सुरू होत नाही. सामान्यतः बाळ सॉलिड फूड खाईपर्यंत पीरियड्स येत नाहीत. हे हार्मोन्समधील बदलांमुळे घडतं.

periods after delivery

ब्रेस्टफीडिंग न केल्यास

जर महिला स्तनपान करत नसेल, तर पीरियड्स लवकर परत येऊ शकतात. साधारणपणे डिलिव्हरीनंतर 6 ते 8 आठवड्यांत ते सुरू होतात. हे शरीर लवकर नॉर्मल हार्मोनल स्थितीत येत असल्यामुळे होतं.

postpartum periods

मिक्स फीडिंग

जर बाळाला ब्रेस्ट मिल्क आणि फॉर्म्युला दोन्ही दिले जात असतील तर पीरियड्स 2 ते 3 महिन्यांत परत येऊ शकतात. ही स्थिती पूर्ण स्तनपान आणि न स्तनपान यामध्ये मधली मानली जाते.

breastfeeding and periods

डिलिव्हरीनंतरचं ब्लीडिंग

डिलिव्हरीनंतर लगेच जो रक्तस्राव होतो ती मासिक पाळी नसते. याला लोचिया म्हणतात. ते 4 ते 6 आठवडे चालू शकतं. हळूहळू त्याचे प्रमाण कमी होत जातं.

menstrual cycle after childbirth

पहिली मासिक पाळी

बाळाच्या जन्मानंतर येणारी पहिली मासिक पाळी जास्त किंवा अनियमित होऊ शकते. कारण शरीर हार्मोनल संतुलन पुन्हा करत असतं. काळानुसार हे सगळं हळूहळू नॉर्मल होतं.

lochia bleeding

क्रॅम्प्समध्ये बदल

काही महिलांना आधीपेक्षा जास्त किंवा कमी पोटदुखी जाणवू शकते. हे हार्मोन्सच्या बदलांमुळे घडतं. बहुतेक वेळा हे काही महिन्यांत आपोआप ठीक होतं.

first period after pregnancy

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर 6 महिन्यांनंतरही पीरियड्स सुरू झाले नाहीत, तर लक्ष द्या. तसंच खूप जास्त ब्लीडिंग किंवा त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नका.

postpartum health

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

Raigad fort history | saam tv