morning walk danger
winter heart attack riskgoogle

Heart Attack: खरंच की काय? थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी चालल्यावर हार्ट अटॅकचा धोका वाढतो, तज्ज्ञांनी काय दिला इशारा?

Winter Health: थंडीच्या सकाळी चालणे हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. रक्तदाब वाढ, प्रदूषण आणि थंड वारा यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.
Published on

सध्या थंडीचं प्रमाण वाढत चालले आहे. या दिवसात अनेकांना सकाळी उठून फिरावसं वाटतं. काही लोक यासाठी अनेक पिकनिक प्लान करतात. काही लोक तर कमी झोप झाली तरी सकाळच्या थंड वातावरण मॉर्निंग वॉकला जातात. यामध्ये तरुणांपेक्षा वृद्धांचा जास्त समावेश असतो. पण थंडीत फिरायला गेल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो. असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. याबद्दल कोणत्या व्यक्तींना धोका असतो? नेमकं कारण काय? आणि हार्ट अटॅकची लक्षण कशी ओळखायची याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

WHO च्या मते, दिवसाला लाखो लोक हार्टमुळे त्यांचा जीव गमवत आहेत. त्यात थंडीच्या दिवसात तुमच्या ह्रदयामध्ये खूप बदल होत असतात. हालचाल कमी असते आणि आळस जास्त असतो. या सगळ्याचा परिणाम तुमच्या हार्टवर होत असतो. काही लोक थंडीत सकाळच्या थंडगार हवेत मॉर्निंग वॉकला जाणं खूप पसंत करतात. पण उत्साहाच्या भरात त्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो. कारण जेव्हा तुम्ही सकाळी घराबाहेर पडता तेव्हा तुमचं शरीर गरम असतं.

जर तुम्ही अचानक गार वाऱ्यात व्यायाम करायला गेलात तर तुमच्या हृदयावर अचानक ताण येतो. कारण थंडीमुळे शरीरातल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते. अचानक रक्तदाबात चढ-उतार झाल्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.

morning walk danger
Chicken Kabab Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंटसारखे ज्यूसी -क्रिस्पी चिकन कबाब

कोणाला जास्त धोका असतो? (Why do morning walks during winter raise heart attack risks?)

थंडीत सगळ्यांनाच धोका असतो असं नाही. काही विशेष रुग्णांना यापासून सावध राहावं लागतं. जसं की, ज्यांना आधीपासून हृदयविकार आहे, हाय ब्लड प्रेशचा त्रास आहे, डायबेटीज आहे, स्ट्रोक आहे किंवा व्यक्तीचे वजन ४० वर्षांपेक्षा जास्त आहे.

सकाळच्या वेळेस अजून काय धोके असतात?

सकाळी चालायला जाणं धोक्याचं असल्याची दुसरं कारण म्हणजे सकाळी हवेतले प्रदूषण जास्त असते. तसेच ऑक्सिजनचं प्रमाण कमी असते. यामुळे चालताना श्वास घेण्यावर ताण येतो आणि याचा हृदयावर दबाव पडतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गोष्ट करणं धोक्याचं ठरू शकतं.

हार्ट अटॅकची लक्षणं कोणती? (Waning signs Heart Attack Risk)

सकाळी चालताना खालील लक्षणं जाणवली तर लगेच चालणं थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या:

1. छातीत दुखणे किंवा जडपणा जाणवणे.

2. अचानक धापा लागणे.

3. अचानक चक्कर येणे.

4. हृदयाचे ठोके वेगाने होताना जाणवणे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

morning walk danger
Multicolor Blouse Designs: साध्या साडीवर मल्टीकलर ब्लाउज ब्लाउज दिसेल परफेक्ट, तुम्हीच दिसाल ग्लॅमरस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com