Sakshi Sunil Jadhav
चविष्ट, मऊ आणि मसालेदार क्रिस्पी चिकन कबाब हा अनेकांचा आवडता स्टार्टर आहे. जो तुम्ही घरी बनवायला नेहमीच कंटाळा करता.
लहान मुलांना जास्त बाहेरचं खाणं देणं टाळलं पाहिजे. पण चटपटीत पदार्थ तुम्ही केव्हातरी घरी तयार करून देऊ शकता. योग्य मॅरिनेशन आणि योग्य पद्धतीने ग्रिल केल्यावर घरगुती कबाब सेम रेस्टॉरंटसारखे लागतात. वाचा सोपी रेसिपी
दह्याने चिकन मऊ होतं. दह्यामुळे कबाब ज्यूसी आणि सॉफ्ट होतात. त्यामुळे ही स्टेप अजिबात टाळू नका.
दही, लिंबाचा रस, आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, मीठ, तेल आणि गरम मसाला हे साहित्य तयार ठेवा.
चिकनमध्ये किंवा दह्यात पाणी असतं. त्यामुळे चिकन नीट पुसून कोरडं करा. आणि सगळे मसाले अॅड करून मॅरिनेट करा.
कबाबमध्ये कांदा घातल्याने ग्रिल करताना तो भाजून छान स्मोकी आणि हॉटेलसारखी चव देतो.
चिकन ४ तास किंवा जमल्यास रात्रभर फ्रिजमध्ये मॅरिनेट करून ठेवा. याने कबाब मऊ आणि चविष्ट होतील.
ओव्हन 240 अंश सेल्सिअस तापमानावर 15 ते 20 मिनिटे आधी गरम करा. चिकन आणि कांदा स्क्युअरवर लावून ग्रिल करा.
पहिल्यांदा 15 ते 20 मिनिटे ग्रिल करून कबाब उलटा. नंतर पुन्हा 10 ते 15 मिनिटे ग्रिल करा. शेवटची 5 मिनिटं वरच्या रॅकवर ठेवा त्याने छान क्रिस्पीपणा येईल. तयार चिकन क्रिस्पी हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.