Sakshi Sunil Jadhav
कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. जो सगळ्यांना आजुबाजूला पाहायला मिळतो. मात्र याची काहींना भीती सुद्धा वाटते.
अनेकांना कुत्री भुंकण्याची जास्त भीती वाटते. तर काहींना कुत्री रडल्याची भीती वाटते.
पुढे आपण कुत्री रडण्याची कारणे जाणून घेणार आहोत. ही माहिती एकदा वाचली की तुमच्या आयुष्यातली भीती कायमची पळून जाऊ शकते.
असं म्हणतात, जेव्हा काही वाईट संकट येणार असतं तेव्हा कुत्री रडायला लागतात. साधारण कुत्री रात्रीच्या वेळेस जास्त रडतात.
लोकांच्या मते, जर कुत्री तुमच्या घराच्या बाहेर रडत असतील तर हे आजाराच्या संकटाचं लक्षण असतं.
कुत्र्यांना नकारात्मक शक्तीची जाणीव असते असं म्हणतात. त्यामुळे जेव्हा रात्री कुत्री नकारात्मक शक्ती पाहतात तेव्हा रडतात.
काहींच्या मते जेव्हा एखाद्या पाळीव कुत्र्याला मालक दुर्लक्षित करतो. तेव्हा कुत्री रडतात. कारण त्यांना भावना असतात.
अचानक खाणे-पिणं सोडणं आणि सतत रडणं हे येणाऱ्या संकटाचं लक्षण असल्याचे काही जण मानतात.
धार्मिक श्रद्धांबरोबरच, कुत्र्यांचे रडणे हे भीती, एकटेपणा, आजार किंवा आवाजामुळेही होऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात.
रात्री कुत्र्यांचे रडल्यावर भीती वाटते. काहीजण याला धार्मिक संकेत मानतात, तर काहीजण वैज्ञानिक कारणं सांगतात. मात्र अशा वेळी घाबरून न जाता परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे.