Sakshi Sunil Jadhav
काही लोक कामानिमित्ताने त्यांच्या सोयीनुसार भाड्याने राहतात. त्यामुळे केंद्र सरकारने भाडेप्रक्रिया 1 जानेवारी 2026 पासून नवे भाडेकरार नियम लागू केले आहेत. जर तुम्ही नियम पाळले नाही तर तुम्हाला दंडासह कठोर कारवाई होऊ शकते.
घर भाड्याने घेतल्यानंतर 2 महिन्यांच्या आत भाडेकराराची नोंदणी करणं आवश्यक आहे. जर नोंदणी नसेल. तर 5,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
लेखी अॅग्रीमेंटचे पेपर्स तुमच्याकडे असायला हवेत. नसेल तर भाडेकरूंचं कायदेशीर संरक्षण कमी होईल.
भाड्याने राहणाऱ्यांसाठी फक्त 2 महिन्यांचे भाडे इतकीच ठेव रक्कम घेता येईल. व्यावसायिक जागेसाठी ही मर्यादा 6 महिन्यांचे भाडे इतकी असेल.
घरमालक करार सुरू असताना अचानक भाडं वाढवू शकणार नाही. करार संपल्यानंतर आणि आधी सूचना दिल्यानंतरच भाडेवाढ करता येईल.
भाडेकरूला कोणतीही पूर्वसूचना न देता घर रिकामे करण्यास भाग पाडता येणार नाही.
भाडेकरू–घरमालक वाद लवकर सोडवण्यासाठी भाडे न्यायालये आणि भाडे लवाद स्थापन करण्यात आलं आहे. याचा निकाल 60 दिवसांत लागणार आहे.
भाड्याच्या उत्पन्नावर टीडीएस लागू होण्याची मर्यादा 2.4 लाखांवरून 6 लाख रुपये करण्यात आली आहे.
राज्याच्या मालमत्ता नोंदणी पोर्टलवर जाऊन तुम्ही नोंदणी करावीत. त्यामध्ये घरमालक व भाडेकरूंची ओळखपत्रे अपलोड करावा लागतो. शेवटी भाड्याचे तपशील भरून ई-स्वाक्षरी केली जाते. यामध्ये ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.