Sakshi Sunil Jadhav
महिलांना प्रत्येक सणावाराला नवीन लुक करायचा असतो. पण त्यासाठी फक्त मेकअप पुरेसा नसतो तर त्यांचे कपडे सुद्धा महत्वाचे असतात.
जर तुम्ही येणाऱ्या कोणत्याही सणाला साडी नेसणार असाल तर साधी, स्लिव्ह्स ब्लाउज न वापरता काही मल्टीकलर ब्लाउज वापरा.
पुढे आपण ब्लाउजच्या नव्या डिझाईन आणि साडीवर मॅचिंग होणाऱ्या डिझाईन्सची माहिती दिली आहे. तुम्ही त्यानुसार तुमचा ब्लाउज निवडावा.
जॉर्जेट सिल्क काश्मिरी वर्क मल्टीकलर ब्लाउज हा खास कार्यक्रमासाठी किंवा समारंभासाठी तुमच्या कोणत्याही साडीवर उठून दिसेल.
मल्टीकलर जॉर्जेट सिक्वेन्स वर्क ब्लाउज तुम्हाला सगळ्यात आकर्षित लूक देतो. सध्या हे ब्लाउज महिलांमध्ये जास्त वापरले जात आहेत.
तुम्ही हे सुंदर मल्टीकलर फ्लॉवर कोडींग वर्क ब्लाउज कोणत्याही लेहेंगा किंवा साडीसोबत घालू शकता. हे ब्लाउज डिझाइन आजकाल महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
तुम्ही एखाद्या प्लेन साडी ट्रेडीशन लूक करणार असाल कर मिरर अॅंड कवडी वर्क येलो मल्टीकलर ब्लाउज वापरू शकता.
जर तुम्हाला तुमच्या साडीला एक वेगळा आणि सुंदर टच देऊन उठावदार दिसायचं असेल तर मल्टीकलर प्रींटेड वी नेक स्लीव्हलेस ब्लाउज नक्की ट्राय करा.