Sakshi Sunil Jadhav
आजकाल हेल्दी जीवनशैलीच्या नावाखाली तांब्याच्या बाटलीतून पाणी पिण्याचा ट्रेंड वाढलाय. आयुर्वेदात तांब्याच्या पाण्याचे फायदे सांगितले जात असले, तरी काही आजार आणि परिस्थितींमध्ये याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यावर त्यातले सूक्ष्म कण पाण्यात मिसळतात. यामुळे जंतू नष्ट होतात, मात्र प्रमाण जास्त झाल्यास ते शरीरासाठी विषारी ठरू शकतं.
किडनी व्यवस्थित काम करत नसल्यास शरीरातून जास्त तांबे बाहेर पडत नाही. त्यामुळे ते शरीरात साचून किडनीचं नुकसान होतं.
संशोधनानुसार, CKD रुग्णांमध्ये किडनीचं कार्य कमी होत असताना रक्तातील तांब्याचं प्रमाण वाढतं, जे आरोग्यासाठी घातक ठरतं.
विल्सन डिजीज या आनुवंशिक आजारात शरीर तांबे बाहेर टाकू शकत नाही. अशा लोकांनी तांब्याच्या बाटलीतील पाणी पूर्णपणे टाळा.
काही लोकांना तांब्यामुळे त्वचेवर खाज, पुरळ, पोटदुखी, उलटी किंवा जुलाब होऊ शकतात. अशी लक्षणं दिसल्यास वापर त्वरित बंद करा.
गर्भधारणेदरम्यान जास्त प्रमाणात तांबं घेतल्यास आई आणि बाळाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
लहान मुलांचे पचनतंत्र पूर्ण विकसित नसतं. जास्त तांबं शरीरात गेल्याने लिव्हर समस्या, उलटी आणि पोटदुखी होऊ शकते.
तांब्याच्या बाटलीतील पाणी पिण्यापूर्वी आपल्या आरोग्यस्थितीनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.