Sakshi Sunil Jadhav
आजकाल अनेक महिलांना आणि पुरुषांनाही पातळ आयब्रो पातळ होण्याची समस्या जाणवतेय. यामागची कारणं आधी समजून घेणं गरजेचं आहे.
सतत थ्रेडिंग, मेकअप, हार्मोनल बदल किंवा पोषणतत्त्वांची कमतरता यामुळे आयब्रो पातळ होतात. मात्र, डर्मेटोलॉजिस्टनुसार काही नैसर्गिक घरगुती उपाय नियमित केल्याने आयब्रोंची वाढ रातोरात व्हायला सुरुवात होते.
कॅस्टर ऑइलमध्ये प्रोटीन, फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. रोज रात्री झोपण्याआधी आयब्रोवर लावून हलक्या हाताने मसाज करुन लावा. याने केसांच्या मुळांना पोषण मिळतं.
नारळ तेल आयब्रोसाठी सगळ्यात सुरक्षित असतं. हे कॉटनने आयब्रोवर लावून रात्रभर ठेवा. याने केस मजबूत होतात.
आवळ्यात व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे आयब्रोची नैसर्गिक वाढ सुधारते. 20 ते 30 मिनिटं लावून नंतर चेहरा धुवा.
ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन E असतं, जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असतं. 1 ते 2 तास आयब्रोवर लावून ठेवल्याने चांगला परिणाम दिसू शकतो.
कांद्याच्या रसात सल्फर असतं. केसांच्या फॉलिकल्ससाठी हे महत्वाचं असतं. हे 10 ते 15 मिनिटं लावून नंतर स्वच्छ धुवा.
सतत थ्रेडिंग, वॅक्सिंग किंवा हेवी आयब्रो प्रॉडक्ट्स वापरल्याने केस कमकुवत होतात. काही दिवस आयब्रोजला विश्रांती देणं गरजेचं आहे. google
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.