Sakshi Sunil Jadhav
कुत्रा हा अनेकांच्या आवडीचा प्राणी मानला जातो. भारतात जागोजागी तुम्हाला कुत्री पाहायला मिळतील.
काही कुत्रा प्रेमी असले तरी काही जण त्याला खूप घाबरतात. कारण त्यांच्या भुंकण्याची आणि चावण्याची त्यांना खूप भिती वाटत असते.
तुम्ही पाहिलं असेल की, कुत्रे हे काही लोकांवरच भुंकतात. तर काही लोकांवर भुंकत नाहीत. याचं कारण आपण समजून घेणार आहोत.
कुत्री माणसाच्या चालण्यावर बारिक लक्ष ठेवतात. जोरात चालणं, जास्त हात हलवणं किंवा सरळ डोळ्यात बघणं ही धोक्यांची लक्षण आहेत.
प्रत्येक कुत्रा हा त्याच्या राहत्या परिसराला स्वत:चा परिसर मानतो. जर त्यांना अनोळखी व्यक्ती दिसली की, ते भुंकून त्यांना येऊ नका असं सांगत असतात.
कुत्र्यांना माणसापेक्षा १ लाख टक्के जास्त वासाची क्षमता असते. त्यामुळे तुम्ही कोणती नशा केली असेल, घाबरत असाल तर ते लांबूनच ओळखून तुम्हाला पकडतील.
जशी माणसं कुत्र्यांना घाबरतात तशी कुत्री सुद्धा घाबरतात. जर अनोळखी व्यक्ती किंवा प्राणी दिसला तर कुत्री घाबरून भुंकतात.
कुत्र्यांना कधी जर एखाद्या व्यक्तीने मारलं तर त्या व्यक्तीला ते ओळखतात. त्यांचे कपडे, चेहरा ओळखून ते भुंकायला लागतात.