Sakshi Sunil Jadhav
आयुष्यात करिअर, नोकरी, कुटुंब किंवा आर्थिक बाबींमध्ये निर्णय घ्यायची वेळ आली की बऱ्याचदा गोंधळ उडतो आणि योग्य मार्ग निवडणं कठीण होतं.
प्राचीन भारतीय राजनीतिज्ञ आणि महान अर्थतज्ज्ञ चाणक्य यांच्या नीती आजच्या काळातही सामान्य माणसाला स्मार्ट आणि व्यवहारी पद्धतीने मार्गदर्शन करतात.
चाणक्यांच्या मते, कोणताही निर्णय घेण्याआधी पूर्ण माहिती मिळवा आणि त्याचा भविष्यातला अंदाजे परिणाम काय होईल हे ओळखा.
जे लोक शांतपणे विचार करून निर्णय घेतात, ते आपल्या चुका लवकर सुधारतात आणि पुढे चांगले पर्याय निवडतात.
चाणक्य नीती सांगते की, वेळेचं योग्य नियोजन आणि कामांना प्राधान्य देणं हे यशस्वी जीवनाचं महत्त्वाचं सूत्र आहे.
पैसा, वेळ, तुमची ऊर्जा आणि नातेसंबंध यांचा योग्य वापर केल्याने भविष्यात यश मिळेल, असं चाणक्य सांगतात.
चुकीची संगत मानसिक शांततेवर परिणाम करते आणि चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढवते, असे चाणक्य सांगतात.
प्रत्येक वेळी धोका टाळणं योग्य नसतं. योग्य वेळ आणि योग्य विचार करून घेतलेला धोका यश मिळवून देऊ शकतो.