भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरातालिका व्रत साजरा केला जातो. यंदा हा व्रत १८ सप्टेंबरला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया दीर्घायुष्य आणि पतीच्या अखंड सौभाग्यासाठी व्रत आणि पूजा करतात. त्याचबरोबर कुमारीका देखील हे व्रत करतात.
हे व्रत भगवान शिव आणि देवी पार्वतीसाठी केले जाते. या दिवशी स्त्रिया पूजेसाठी सोळा शृंगार करतात. जर तुम्ही देखील पहिल्यांदा हरतालिकेच व्रत करणार असाल तर पूजेच्या साहित्यात या गोष्टींचा समावेश नक्की करा
1. हरतालिका तीज शुभ मुहूर्त
पंचागानुसार, तृतीया तिथी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11:08 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12:39 पर्यंत असेल. परंतु हे व्रत (Vrat) सोमवारी १८ सप्टेंबरला केले जाईल. सकाळी ६ ते रात्री८.२४ पर्यंत पूजेसाठी योग्य वेळ आहे.
2. हरतालिका तीज पूजेचे साहित्य :
नारळ, कलश, बेलपत्र, शमीची पाने, केळीचे पाने, धतुर्याचे फळ, तूप, मध, गुलाल, चंदन, अत्तर, पाच फळे, सुपारी, अक्षता, धूप, दीप, कापूर, गंगाजल, दुर्वा आणि जनेयू इ.
या व्रतात देवी पार्वतीला टिकली, सिंदूर, कुंकू, मेहंदी, काजळ, बांगड्या आणि कंगवा या गोष्टी अर्पण केल्या जातात.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.