Hartalika Date 2023: हरतालिका व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

Hartalika Tithi 2023: हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला हरतालिका व्रत साजरे केले जाते.
Hartalika Date 2023
Hartalika Date 2023Saam Tv

Hartalika Vrat 2023 :

हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला हरतालिका व्रत साजरे केले जाते. यादिवशी सौभाग्यवती स्त्री उपवास करते. यंदा हा व्रत १८ सप्टेंबर रोजी आहे. तसेच हे व्रत कुमारीका देखील चांगला, सुयोग्य वर प्राप्त व्हावा म्हणून करतात.

हे व्रत करताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मातीच्या मूर्तीची किंवा फोटोची विधीवत पूजा करतात. हा दिवस भगवान शंकाराशी संबंधित असून यादिवशी महिला निर्जल उपवास ठेवतात. जाणून घेऊया शुभ मुहूर्त,पूजा पद्धत आणि महत्त्व

Hartalika Date 2023
Ganapati Home Decoration Ideas 2023 : सुंदर आणि इको फ्रेंडली! बजेटमध्ये सजवा लाडक्या बापासाठी घर, अशी करा तयारी

1. हरितालिका तीज शुभ मुहूर्त (हरतालिका तीज 2023 शुभ मुहूर्त )

पंचागानुसार, तृतीया तिथी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11:08 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12:39 पर्यंत असेल. परंतु हे व्रत (Vrat) सोमवारी १८ सप्टेंबरला केले जाईल. सकाळी ६ ते रात्री८.२४ पर्यंत पूजेसाठी योग्य वेळ आहे.

Hartalika Date 2023
Besan Ladoo Side Effects : चवीचवीने खाताय बेसनाचा लाडू ठरु शकतो आरोग्यासाठी घातक!

2. हरितालिका व्रताची पूजा पद्धत

  • सकाळपासून संकल्प करा आणि निर्जल उपवास करा, तुमची प्रकृती ठीक नसेल तर तुम्ही फळेही (Fruits) खाऊ शकता.

  • संध्याकाळी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा.

  • त्यानंतर माता पार्वतीला सर्व वस्तू अर्पण करा आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा.

  • विवाहित महिलांनी आपल्या सासूला शुभेच्या वस्तू द्याव्यात आणि त्यानंतर सासूचा आशीर्वाद घ्यावा.

  • शिव आणि पार्वतीची एकत्र पूजा (Puja) केल्यानंतर उपवास सोडावा, या दिवशी रात्रीची जागर करणे देखील उत्तम आहे.

3. या मंत्रांचा जप करा

  • तुमच्या वैवाहिक इच्छा पूर्ण करण्यासाठी व्रताच्या दिवशी या मंत्राचा 11 वेळा भक्तिभावाने जप करा. रुद्राक्ष जपमाळेने मंत्राचा जप करा आणि पूर्ण श्रृंगार केल्यानंतरच करा, संध्याकाळी मंत्राचा जप करणे चांगले.

  • मंत्र असा आहे: 'हे गौरीशंकरा अर्धांगी, जसे तू शंकराला प्रिय आहेस आणि माझे कल्याण कर, कांतकांता सुदुर्लभम्'

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Hartalika Date 2023
Which Day Clean Home Temple : घरातल्या मंदिराची साफसफाई कोणत्या दिवशी करायला हवी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com