Extramarital dating: देशातील 148% विवाहित महिला करतात बाहेर लफडं! एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंगची कारणं ऐकून थक्क व्हाल

Extra marital dating India: भारतामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढत असून ग्लिडनने ४ मिलियन युजर्सचा टप्पा पार केला आहे. महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात वाढला असून नातेसंबंधांची व्याख्या बदलताना दिसतेय.
Extra marital dating India
Extra marital dating Indiasaam tv
Published On

आजच्या काळात नातेसंबंधांची व्याख्या झपाट्याने बदलताना दिसतेय. डिजिटल युगामुळे पारंपरिक लग्न आणि नात्यांच्या चौकटी आता हळूहळू सैल होताना दिसतायत. अशातच एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग प्लॅटफॉर्म ग्लिडनने भारतात ४ मिलियन युजर्सचा टप्पा पार केलाय. यावेळी त्यांनी नात्यामध्ये कसे बदल होतात हे स्पष्ट केलं आहे.

ग्लिडनच्या आकडेवारीनुसार, एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंगमध्ये पुरुषांची संख्या अजूनही सुमारे ६५ टक्क्यांनी जास्त आहे. तर गेल्या दोन वर्षांत महिलांच्या सहभागात तब्बल १४८ टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलंय. हा बदल केवळ आकड्यांपुरता मर्यादित नसून समाजातील मानसिकतेतही मोठा बदल होत असल्याचं यातून दिसून येतं.

बदलत्या काळात महिलांची भूमिका मोठ्या प्रमाणात बदलताना दिसतेय. त्या फक्त पारंपरिक चौकटीत अडकून राहिलेल्या नाहीत. एका बाजूला त्या लग्नात स्थिरता आणि सुरक्षितता शोधत असतात तर दुसऱ्या बाजूला भावनिक जोड किंवा थोडा वेगळा अनुभव घेण्याची इच्छाही व्यक्त करताना दिसतात. विशेषतः बंगळूरू आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये हा ट्रेंड जास्त प्रमाणात दिसतोय.

Extra marital dating India
Relationship Tips: अचानक पार्टनरच्या वागणूकीत दिसणारे 'हे' बदल ओळखा; बॉयफ्रेंड तुमच्याशी कधीही करू शकतो ब्रेकअप!

सर्व्हेक्षणातून काय आलं समोर?

IPSOS च्या २०२५ च्या सर्वेनुसार, अफेअर करण्यामागे नेहमीच चुकीचे हेतू असतात असं नाही. अनेक वेळा लोकांकडे स्वतःसाठी वेळच उरत नाही. सुमारे ३३ टक्के लोकांनी सांगितलं की, काम आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये ते स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. त्यामुळे काही जण डिजिटल माध्यमांमधून थोडा वेगळा अनुभव शोधण्याचा प्रयत्न करतात.

यापूर्वी अनेकांचा असा समज होता की, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर फक्त पुरुष करतात. मात्र, नव्या आकडेवारीनुसार, आता महिलाही त्यात तितक्याच प्रमाणात सहभागी होत असल्याचं दिसून येतंय. सर्व्हेनुसार, ४३ टक्के पुरुष आणि ४२ टक्के महिलांनी विवाहबाह्य भावनिक किंवा शारीरिक नातेसंबंध असल्याचं मान्य केलंय.

Extra marital dating India
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला तगडा झटका; आयपीएलच्या सलामीलाच वर्ल्डकप उपविजेत्या संघाचा 'कॅप्टन'च बाद

मोठ्या शहरांमध्ये वाढला अॅप्सचा वापर

मोठ्या शहरांमध्ये या अॅप्सचा वापर अधिक असल्याचंही समोर आलं आहे. बंगळूरू आणि हैदराबादमध्ये सर्वाधिक वापर होत असला तरी आता लखनऊ आणि सुरतसारखी लहान शहरंही या यादीत पुढे येतायत. बरेच लोक दुपारच्या ब्रेकमध्ये किंवा रात्री उशिरा या अॅप्सचा वापर करत असल्याचं दिसतं.

पसंतीच्या बाबतीतही काही ठराविक ट्रेंड दिसून येतात. पुरुष साधारण २५ ते ३० वयोगटातील महिलांना पसंती देतात. तर महिलांचा कल स्थिर करिअर असलेल्या डॉक्टर, सीए सारख्या बिझनेसमनकडे जास्त असतो. यावरून असं स्पष्ट होतं की, विवाहबाह्य नात्यांमध्येही स्थिरता आणि आर्थिक सुरक्षिततेचं महत्त्व अजूनही कायम आहे.

Extra marital dating India
Questions before marriage: लग्नासाठी तयार आहात का? लग्नापूर्वी स्वतःला विचारा हे 5 सोपे पण महत्त्वाचे प्रश्न

सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे अशा प्रकारचे संबंध ठेवणं अधिक सोपं झालं आहे. सुमारे ६० टक्के लोकांनी मान्य केलं आहे की, ऑनलाइन फ्लर्टिंगची सुविधा ही अफेअर्स वाढण्यामागील मोठं कारण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com