Questions before marriage: लग्नासाठी तयार आहात का? लग्नापूर्वी स्वतःला विचारा हे 5 सोपे पण महत्त्वाचे प्रश्न

Marriage decision tips: लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला विचारायचे महत्त्वाचे प्रश्न जाणून घ्या. मानसिक, भावनिक आणि आर्थिक तयारी कशी तपासावी हे जाणून घ्या.
Hindu marriage traditions
Hindu marriage traditionssaam tv
Published On

लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या नात्यामुळे आनंद, साथ आणि सुरक्षिततेची भावना मिळते. पण त्याचबरोबर तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्याही येतात. अनेक वेळा घरचे सांगतात म्हणून किंवा वय झालं म्हणून लोक घाईघाईत लग्नाचा निर्णय घेतात. पण खरंच आपण या बदलासाठी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तयार आहोत का, हा प्रश्न स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे.

लग्नासाठी होकार देण्यापूर्वी स्वतःच्या मनाची तयारी तपासणं आवश्यक आहे. हा निर्णय आपल्या इच्छेने घेतोय की इतरांच्या अपेक्षांमुळे हे समजून घेण्यासाठी काही प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत. यासाठी तुम्ही स्वतःला कोणते प्रश्न विचाराल ते जाणून घ्या.

हा निर्णय खरोखर तुमचाच आहे का?

अनेकदा घरच्यांचा दबाव किंवा मित्रांच्या सांगण्यामुळे प्रभावामुळे लोक लग्नाला तयार होतात. पण थोडा वेळ घेऊन स्वतःला विचारणं महत्त्वाचं आहे की, तुम्हाला खरंच कोणासोबत आयुष्य घालवायचं आहे का, की फक्त एकटेपणा किंवा इतरांच्या अपेक्षांपासून दूर राहण्यासाठी हा निर्णय घेतला जातोय?

Hindu marriage traditions
Relationship Tips: अचानक पार्टनरच्या वागणूकीत दिसणारे 'हे' बदल ओळखा; बॉयफ्रेंड तुमच्याशी कधीही करू शकतो ब्रेकअप!

दुसऱ्या व्यक्तीसोबत आयुष्य शेअर करण्याची तयारी आहे का?

लग्नानंतर ‘मी’ पेक्षा ‘आपण’ महत्त्वाचं होतं. तुमचे निर्णय, वेळ आणि आर्थिक बाबीही दोघांवर परिणाम करतात. त्यामुळे स्वतःला विचारा की, तुम्ही तुमच्या सवयींमध्ये बदल करायला आणि दुसऱ्याच्या आवडीनिवडींना स्वीकारायला तयार आहात का?

अपेक्षा वास्तवाशी जुळतात का?

सिनेमा किंवा सोशल मीडियावर दिसणाऱ्या परफेक्ट नात्यांमुळे आपण लग्नाबद्दल एक वेगळीच कल्पना करून ठेवतो. पण खऱ्या आयुष्यात मतभेद, अडचणी आणि जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे स्वतःला विचारा की तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्याच्या चांगल्या आणि कमी दोन्ही गोष्टींसह स्वीकारू शकता का?

Hindu marriage traditions
Relationship Tips: पार्टनरकडे या गोष्टी सुद्धा मागाव्या लागतायत? तर हेच आहेत ब्रेकअपचे संकेत

आर्थिकदृष्ट्या तयार आहात का?

पैसा सगळं काही नसलं तरी स्थिर आयुष्यासाठी आर्थिक नियोजन खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघं मिळून भविष्यातील खर्च, बचत आणि जबाबदाऱ्या नीट सांभाळू शकता का, हे पाहणं गरजेचं आहे. पैशांबाबत स्पष्टपणे बोलल्याने पुढील अनेक वाद टाळता येऊ शकतात.

संवाद प्रामाणिक आहे का?

एखादं नातं मजबूत राहण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रत्येक गोष्टीवर मोकळेपणाने बोलू शकता का, हा प्रश्न स्वतःला विचारा. जर तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करताना संकोच वाटत असेल किंवा समोरची व्यक्ती तुम्हाला समजून घेणार नाही असं वाटत असेल, तर भविष्यात अडचणी येऊ शकतात.

Hindu marriage traditions
Relationship Tips: हे ५ संकेत दिसले तर समजा तुमचा पार्टनर ब्रेक-अप करण्याचा विचार करतोय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com