Relationship Tips: पार्टनरकडे या गोष्टी सुद्धा मागाव्या लागतायत? तर हेच आहेत ब्रेकअपचे संकेत

Surabhi Jayashree Jagdish

नातं

नात्यात प्रेम, समजूतदारपणा आणि एकमेकांची काळजी या गोष्टी नैसर्गिकपणे यायला हव्यात. पण काही वेळा पार्टनरकडे सतत मूलभूत गोष्टी मागाव्या लागतात, आणि त्या न मिळाल्याने मनात असुरक्षितता, अपमान किंवा दुर्लक्ष झाल्याची भावना निर्माण होते.

नातं तुटण्याचे संकेत

अशा वेळी हे संकेत नात्यात कुठेतरी काहीतरी बिघडलंय हे स्पष्टपणे दाखवतात. काही गोष्टी वारंवार मागाव्या लागत असतील, तर ते ब्रेकअपकडे जाणारे मोठे इशारे असू शकतात.

प्रेम आणि लक्ष मागावं लागणं

तुम्ही सतत “माझ्याकडे लक्ष दे”, “माझ्याशी बोल” असं सांगत असाल तर नात्यात भावनिक अंतर वाढतंय. प्रेम मिळावं म्हणून विनवणी करावी लागली तर हे गंभीर आहे.

वेळ द्यायला सांगावं लागणं

पार्टनरकडे भेटण्यासाठी किंवा बोलण्यासाठी वेळ मागत राहावं लागत असेल तर प्राधान्य कमी झालंय. नात्यात वेळ देणं ही मूलभूत गरज आहे.

जबाबदारीची वाटणी मागणं

सगळ्या गोष्टी तुमच्यावरच पडत असतील आणि पार्टनर काहीच जबाबदारी घेत नसेल तर नातं असंतुलित होतं. घर, नातं, भावनिक भार सगळं तुम्हीच सांभाळत असाल. हे नातं एकतर्फी आणि थकवणारं बनतं.

सपोर्ट किंवा साथ मागणं

तुम्हाला गरज असताना साथ न मिळणं, कठीण काळात पार्टनरचा पाठींबा न मिळणं हे वेदनादायक असतं. अशावेळी हे नातं तुटण्याची मोठं चिन्हं आहे.

पारदर्शकता मागणं

लपवाछपवी, खोटं बोलणं किंवा सतत काहीतरी दडवणं चालू असेल तर पारदर्शकता मागावी लागते. नात्यात विश्वास नसेल तर काहीच राहात नाही. हे थेट ब्रेकअपचा रेड सिग्नल आहे.

Chakli Tips: घरी असलेल्या चकल्या मऊ झाल्यात? या सोप्या टिप्सने पुन्हा होतील कुरकुरीत आणि खुसखुशीत

Chakli Tips | SAAM TV
येथे क्लिक करा