Surabhi Jayashree Jagdish
दिवाळीच्या दिवसांत घराघरात केलेल्या चकल्या काही दिवस ठेवल्यानंतर मऊ पडतात. हवेत ओलावा आल्याने किंवा डब्यात नीट साठवण न केल्याने त्यांचा कुरकुरीतपणा कमी होतो.
पण काळजी करण्याची गरज नाही, कारण काही सोप्या घरगुती उपायांनी या चकल्या पुन्हा ताज्या आणि कुरकुरीत बनवता येतात. खाली दिलेल्या टिप्स वापरल्यास चकली पुन्हा खमंग आणि चविष्ट बनेल.
मऊ झालेल्या चकल्या मायक्रोवेव्हमध्ये ३० सेकंद ते १ मिनिट ठेवा. थोडं थंड झाल्यावर त्या पुन्हा कुरकुरीत होतील.
ओव्हन १८० डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम करा आणि चकल्या ५-७ मिनिटं ठेवा. थंड झाल्यावर त्या पुन्हा खुसखुशीत लागतील.
मायक्रोवेव्ह नसल्यास नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर चकल्या ठेवा. मंद आचेवर दोन्ही बाजूंनी थोडं भाजून घ्या. काही मिनिटांतच त्यांचा कुरकुरीतपणा परत येईल.
जर सूर्यप्रकाश चांगला असेल तर चकल्या २-३ तास उन्हात ठेवा. नैसर्गिक उष्णतेने त्यातील ओलावा निघून जातो. त्यामुळे त्या पुन्हा कुरकुरीत होतात.
चकल्या काही तासांसाठी कागदात गुंडाळून ठेवल्यास त्यातील ओलावा शोषला जातो. यानंतर त्या अधिक खुसखुशीत लागतात.
खूप मऊ झालेल्या चकल्या हलक्या तेलात १०-१५ सेकंद तळा. जास्त वेळ तळू नका, कारण त्या जळू शकतात.