Surabhi Jayashree Jagdish
भारतीय खासकरून महाराष्ट्रातील स्वयंपाकघरांमध्ये कांद्याचा वापर केला जातो. अशा वेळी कांदा आधी तेलात परतून त्याची उग्रता कमी करणं योग्य ठरतं. मात्र काही भाज्यांच्या फोडणीमध्ये कच्चा कांदा वापरू नये.
दुधी भोपळ्याच्या भाजीची चव सौम्य असते. त्यामुळे या भाजीच्या फोडणीत कांदा वापरल्यास चव कडवट लागू शकते.
दोडका पटकन पाणी सोडतो आणि मऊ होतो. कच्चा कांदा घातल्यास त्याचा नैसर्गिक गोडवा हरवतो. त्यामुळे फोडणीत कांदा आधी परतून वापरणे आवश्यक आहे.
या भाज्यांमध्ये चव सुगंधावर अवलंबून असते. कच्चा कांदा टाकल्यास त्याचा तिखट वास वरचढ होतो. फोडणीत कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतवा.
भेंडी आधीच चिकट होत असल्याने कच्चा कांदा टाकला तर चिकटपणा वाढतो.कांदा परतल्याने ओलसरपणा कमी होतो.
काकडी थंड स्वभावाची आणि रसाळ असते. कच्चा कांदा घातल्यास चव विस्कटते आणि पाणी जास्त सुटते. काकडीच्या भाजीत सामान्यतः फोडणीशिवाय किंवा हलकी उडीद-कडवट फोडणी दिली जाते.
शेवग्याच्या शेंगांना नैसर्गिक थोडीशी कडवट चव असते. कच्चा कांदा टाकल्यास कडवटपणा वाढतो.
या भाज्यांची चव मऊ आणि रसाळ असते. कच्चा कांदा घातल्यास चव जोरदार होऊन भाज्याचा नैसर्गिक सौम्यपणा हरवतो. नेहमी कांदा आधी परतून मग भाजी घालावी.