Relationship Tips: अचानक पार्टनरच्या वागणूकीत दिसणारे 'हे' बदल ओळखा; बॉयफ्रेंड तुमच्याशी कधीही करू शकतो ब्रेकअप!

Signs Partner is Losing Interest In You: नात्यामध्ये भांडण झालं तर ते सोडवता येतं. मात्र समोरच्या व्यक्तीला भांडून तुमच्याशी दूर जायचं असेल किंवा ब्रेकअप करायचं असेल तर त्याच्या वागणूकीत काही बदल दिसून येतात.
Relationship Tips
Relationship Tipssaam tv
Published On

रिलेशनशिप कोणतीही असो, त्यामध्ये प्रेमासोबत भांडणं ही होतातच. अनेकदा रिलेशनमध्ये छोटीशी भांडणं होणं देखील योग्य मानलं जातं. असं म्हणतात नात्यात थोडासा रुसवा-फुगवा आला नातं दीर्घकाळ टीकतं. मात्र अनेकदा असं घडताना दिसतं की, आपल्या पार्टनरचा आपल्यामध्ये काहीसा कमी इंटरेस्ट दिसून येतो.

अनेकदा समोरच्या पार्टनरचा इतका इंटरेस्ट कमी होतो की, त्याला आपण आवडतो की नाही असा प्रश्नही मनात उपस्थित होतो. समोरच्या व्यक्तीला या गोष्टी सामन्य वाटू लागतात मात्र यामुळे दूरावा वाढू लागतो.

मानसशास्त्रानुसार, एक पार्टनर जेव्हा रिलेशनमधून बाहेर पडण्याचा विचार करत असेल किंवा त्याचा इंटरेस्ट नात्यातून संपत चालला असेल तर त्याच्या वागणूकीत काहीसे बदल होतात. हे बदल वेळीच ओळखणं गरजेचं आहे. कारण यामुळे नातं वेळीच थांबवणं दोघांच्याही फायद्याचं असतं. नातं संपवायचं असल्यास समोरच्या व्यक्तीच्या वागणूकीत कोणते बदल दिसून येतात हे जाणून घेऊया.

Relationship Tips
Eye Care: उन्हाळ्यात 'या' 5 डोळ्यांच्या समस्या गंभीर ठरू शकतात; वेळीच सल्ला घेणं गरजेचं

पार्टनरकडून मिळणारे हे संकेत ओळखा

  • ज्यावेळी तुमच्या पार्टनरला तुमच्यामध्ये इंटरेस्ट नसतो तेव्हा दिसून येणारं एक लक्षण म्हणजे तो व्यक्ती तुमच्यापासून काहीसा दूर होता जातो. पूर्वी जो व्यक्ती तुमच्याशी छोट्या-छोट्या गोष्टींवर चर्चा करायचा त्या आता पूर्णपणे बंद झाल्यात.

  • जर तुमचा पार्टनर तुमच्या मूडची काळजी करत नसेल तर ही वॉर्निंग साईन असू शकते. यावेळी तुमच्या पार्टनरचा इंटरेस्ट कमी झाला आहे असं तुम्ही समजू शकता.

Relationship Tips
Sugarcane Juice : एक ग्लास उसाचा रस प्यायल्यास साखरेची पातळी किती प्रमाणात वाढते? जाणून घेतल्यास तुम्हालाही बसेल धक्का
  • ज्यावेळी शारीरिक संबंधाची वेळ येते तेव्हा तुमचा पार्टनर संकोच बाळगत असेल किंवा ही गोष्ट रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर हा देखील एक बदल असू शकतं. असं झाल्यास समजून जा की, त्या व्यक्तीला तुमच्यात इंटरेस्ट नाही.

Relationship Tips
Hours of sleep by age: वयोमानानुसार एका दिवसात किती तास झोप घेतली पाहिजे? स्लीप चार्ट पाहून ठरवा तुमची झोप पूर्ण होतेय का!
  • पार्टनरसोबत जर तुम्हाला वेळ घालवायचा असेल आणि अशावेळी तो बहाणे देत असेल तर हे देखील नातं तोडण्याचं एक लक्षणल असू शकतं. याचा अर्थ त्यांची प्राथमिकता बदलली असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com