Surabhi Jayashree Jagdish
कोणतंही नातं टिकण्यासाठी विश्वास खूप महत्त्वाचा असतो. विश्वास नसेल तर नात्यात तडे जाऊ लागतात. शेवटी नातं तुटण्याची वेळ येऊ शकते.
आज आपण काही महत्त्वाचे संकेत जाणून घेणार आहोत. हे संकेत जोडीदार दुरावण्याची शक्यता दाखवतात. वेळीच ओळखल्यास निर्णय घेणं सोपं जातं.
जर तुमचा जोडीदार तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असेल. तुमच्या मतांना काहीच महत्त्व देत नसेल. तर तो नात्यातून बाहेर पडण्याच्या विचारात असू शकतो.
गरज असेल तेव्हाच तो प्रेमाने बोलत असेल आणि इतर वेळी संवाद टाळत असेल. तर हे नातं कमकुवत असल्याचं लक्षण मानलं जातं.
नात्यात इमोशन्स खूप गरजेचे असतात. जर ती पूर्णपणे जाणवत नसेल, तर नातं कधीही संपुष्टात येऊ शकतं.
जोडीदार तुमच्यासोबत भविष्यासाठी योजना करत नसेल किंवा दीर्घकालीन विचार टाळत असेल तर थोडं अंतर ठेवणं योग्य ठरू शकतं.
तो वारंवार लोकांसमोर तुमचा अपमान करत असेल तर हे एक कारण असू शकतं. पार्टनर बोलण्यातून तुम्हाला कमीपणा दाखवत असेल तर हे नातं धोक्यात असल्याचा स्पष्ट इशारा आहे.