White hair facts: एक ग्रे हेअर उपटला की अनेक केस पांढरे होतात? जाणून घ्या सायन्स काय सांगतं

Does plucking one grey hair cause more white hair: वास्तुशास्त्रानुसार जेवण करताना दिशा, ताट, पोळ्यांची संख्या आणि अन्न मांडणी यांना विशेष महत्त्व आहे. या सोप्या वास्तु नियमांचे पालन केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा, सुख-समृद्धी आणि चांगले वातावरण कायम राहू शकते.
White hair facts
White hair factssaam tv
Published On

वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. यामध्ये एक दिसणारा बदल म्हणजे केस पांढरे होणं...सामान्यपणे आपण याला केस पिकणं असं म्हणतो. मात्र आजकाल केवळी प्रौढ किंवा वयस्कर व्यक्ती नव्हे तर तरूणांचे केसही पिकलेले दिसतात.

अशावेळी अनेकजण पिकलेले केस काढून टाकतात. कदाचित तुम्हीही असं केलं असेल. तर काहींच्या मनात भीती असते की, पांढरे केस काढल्याने त्याचं प्रमाण वाढतं. मात्र खरंच असं होतं का? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

White hair facts
Maternal Sepsis: गर्भधारणेनंतरचा संसर्ग ठरू शकतो जीवघेणा, मॅटर्नल सेप्सिसबाबत महिलांनी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

लोकांच्या मनातील समज

एक पांढरा केस उपटला तर त्याजागी अनेक पांढरे केस येतात, हा समज आजही अनेकांच्या मनात कायम आहे. पण तज्ज्ञांच्या मते, हा फक्त गैरसमज असून त्यामागे कोणताही सायंटीफिक आधार नाही.

केस पांढरे का होतात?

आपल्या केसांचा रंग हा मेलानिन नावाच्या रंगद्रव्यामुळे ठरतो. हे मेलानिन केसांच्या फॉलिकल्समध्ये तयार होत असतं. वय वाढल्यावर किंवा काही कारणांमुळे मेलानिनचं प्रोडक्शन कमी झालं की केस हळूहळू पांढरे किंवा करडे दिसू लागतात.

White hair facts
Diabetic Kidney Problems: मधुमेही रूग्णांमध्ये ही ३ प्रमुख लक्षणं दिसली तर व्हा सावध; किडनी निकामी होण्याचा धोका

एक पांढरा केस उपटल्याने पांढऱ्या केसांची संख्या वाढते?

तज्ज्ञ सांगतात की, एक पांढऱ्या केस उपटल्याने त्याच्या आजूबाजूच्या फॉलिकल्सवर कोणताही परिणाम होत नाही. म्हणजेच तुम्ही एक केस उपटला, तरी त्याच जागी पुन्हा एकच केस उगवतो. त्यामुळे एक केस उपटला की अनेक केस पांढरे होतात ही केवळ पिढ्यान् पिढ्या चालत आलेली समजूत सायन्सच्या दृष्टीने चूक आहे.

केस उपटणं योग्य आहे का?

पांढरे केस दिसू नयेत म्हणून अनेकजण ते लगेच उपटतात. पण हे सवयीचं झाल्यास टाळूच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. सतत केस उपटल्याने केस पातळ होणं, टाळूवर डाग किंवा जखमा तयार होणं अशा तक्रारी उद्भवतात.

White hair facts
Vastu Tips: जेवणासाठी ताटात ३ पोळ्या वाढताय तर थांबा; अन्नासंबंधीचे वास्तू नियम जाणून घ्या

ग्रे केस लपवण्यासाठी काय करता येईल?

जर काही पांढरे केस तात्पुरते लपवायचे असतील तर बाजारात मिळणारे हेअर टच-अप मस्कारा किंवा पेन वापरता येऊ शकतं. याशिवाय टेम्पररी रूट पावडर किंवा स्प्रेचाही वापर करून ग्रे रूट्स सहज झाकता येतात.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com