Vastu Tips: जेवणासाठी ताटात ३ पोळ्या वाढताय तर थांबा; अन्नासंबंधीचे वास्तू नियम जाणून घ्या

Eating vastu rules: वास्तुशास्त्रानुसार जेवण करताना दिशा, ताट, पोळ्यांची संख्या आणि अन्न मांडणी यांना विशेष महत्त्व आहे. या सोप्या वास्तु नियमांचे पालन केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा, सुख-समृद्धी आणि चांगले वातावरण कायम राहू शकते.
Eating vastu rules
Eating vastu rulessaam tv
Published On

वास्तुशास्त्राचा आपल्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीवर परिणाम होत असतो. विशेषतः खाण्याच्या सवयींचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच नाही तर आपल्या घरातील वातावरणावरही होतो. आपण कसे बसून जेवतो, जेवण कसं वाढतो किंवा ताटात काय घेतो या सर्व गोष्टी ऊर्जेच्या प्रवाहाशी जोडलेल्या आहेत.

शास्त्रानुसार, अन्नाशी संबंधित साध्या वास्तु नियमांचं पालन केल्याने घरात सकारात्मकता आणि समृद्धी टिकून राहते. या नियमांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. अन्नाशी संबंधित हे वास्तु नियम समजून घेणं महत्त्वाचं आहे.

योग्य दिशेला बसून जेवा

वास्तुशास्त्रानुसार, जेवणाच्या दिशेकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. ईशान्य दिशेला तोंड करून जेवणं ही सर्वात शुभ दिशा मानली जाते. ही दिशा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानली जाते. यामुळे शरीर आणि मन या दोघांनाही फायदा होतो. दक्षिण दिशेला तोंड करून जेवणं अशुभ मानण्यात येतं.

Eating vastu rules
Vastu Tips: घरातील या चुका गरिबीचं मोठं कारण ठरू शकतात, देवी लक्ष्मी होईल नाराज

योग्य ताट निवडा

तुम्ही जेवण्यासाठी वापरत असलेल्या ताटाचा तुमच्या ऊर्जेवरही परिणाम होतो. वास्तूनुसार, पितळेचं ताट सर्वोत्तम मानलं जातं कारण ते आरोग्यासाठी फायदेशीर असते. पितळेचे ताट उपलब्ध नसल्यास स्टीलचा वापर करता येतो. मात्र, प्लास्टिकची ताटे टाळावीत. त्याचप्रमाणे तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या ताटात जेवणं अशुभ मानलं जातं.

पोळ्यांची संख्या

जेवण वाढताना शिष्टाचार पाळणेही महत्त्वाचे आहे. ताटात प्रथम भात आणि पोळी ठेवणं शुभ मानलं जातं. पोळ्यांची संख्याही महत्त्वाची असते. वास्तूनुसार, एका वेळी एक, दोन किंवा चार पोळ्या वाढणं शुभ मानले जातं. तर तीनपेक्षा जास्त पोळ्या वाढू नयेत.

Eating vastu rules
Office Desk Vastu: नोकरीत नवी संधी आणि प्रमोशन मिळत नाहीये? ऑफिसच्या डेस्कवरून या गोष्टी लगेच काढून टाका

मीठ आणि लोणचं

जेवणाच्या ताटात मीठ आणि लोणच्याची मांडणी देखील महत्त्वाची आहे. जर तुम्ही जास्तीचं मीठ वापरत असाल तर ते ताटाच्या उजव्या बाजूला ठेवावं. लोणचे डाव्या बाजूला ठेवणं शुभ मानण्यात येतं. अन्नाशी संबंधित या सोप्या वास्तू तत्त्वांचं पालन करून, तुम्ही केवळ घरात चांगलं वातावरण निर्माण करू शकता.

Eating vastu rules
Office Desk Vastu: नोकरीत नवी संधी आणि प्रमोशन मिळत नाहीये? ऑफिसच्या डेस्कवरून या गोष्टी लगेच काढून टाका

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com