Cancer Symptoms Risk: कॅन्सरची ५ लक्षणे कधीही दुर्लक्षित करू नका, अन्यथा जीव गमावण्याची भीती; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Early Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपचार करणं खूप महत्वाचं आहे. अन्यथा तुम्हाला कमी वयातच तुमचा जीव गमवावा लागू शकतो.
Signs of cancer fatigue lumps cough
Warning signs of serious diseasesgoogle
Published On

भारतात गेल्या काही वर्षात अनेक गंभीर आजार झपाट्याने वाढले आहेत. त्यातला एक आजार म्हणजे कॅन्सर. कॅन्सरचे रुग्ण गेल्या काही वर्षांपासून वाढत चालले आहेत. हा आजार इतका गंभीर आहे की, याची लक्षणं सुरुवातीला कळत नाहीत आणि त्यावर उपचारही वेळेवर होत नाहीत. मग याचा शेवट मृत्यूनेच होतो.

सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की, कॅन्सर हा प्रत्यक्षात एकच आजार नाही. यामध्ये पेशींची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन त्या शरीराच्या इतर भागात पसरतात, अशी ही गंभीर स्थिती आहे. या आजारामागे अनुवांशिक बदल हे महत्वाचं कारण मानलं जातं. डॉक्टर वेगवेगळ्या चाचण्या आणि बायोप्सीच्या मदतीने कॅन्सरवर उपचार करतात. तर उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, रेडिएशन, केमोथेरपी आणि इम्युनोथेरपी याचा समावेश असतो.

Signs of cancer fatigue lumps cough
Chanakya Niti: हरलेला डाव कसा जिंकाल, चाणक्यांनी दिल्या कठीण काळात सावरण्याच्या टिप्स

कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही सामान्य वाटणारी लक्षणं दिसून येतात. पण बऱ्याचदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. ते लक्षण म्हणजे सतत थकवा जाणवणं आहे. पुरेसा आराम घेतल्यानंतरही थकवा कमी होत नसेल, तर हे ब्लड कॅन्सर किंवा शरीरातल्या पोषणावर परिणाम करणाऱ्या आजारांचं संकेत असू शकतं. अशा परिस्थितीत वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

तसेच शरीरावर अचानक गाठी किंवा सूज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. हे सुद्धा धोक्याचं संकेत असू शकतं. त्वचेवर, स्तनात किंवा लिम्फ नोड्समध्ये जाणवणारी कोणतीही नवीन गाठ ही ट्यूमरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. तसेच त्वचेतल्या बदलांकडेही दुर्लक्ष करू नका.

बऱ्याचजणांना माहित असलेलं कॅन्सरचं लक्षण म्हणजे खोकला. यामध्ये खोकला जास्त वाढतो, घशातून अन्न गिळताना त्रास होतो, कधीकधी खोकल्यातून रक्त येतं, वेदना जाणवतात. अशी लक्षणं दिसल्यास कसलाही विचार न करता आधी डॉक्टरांकडे धाव घ्या. त्यावर उपचार करा. सुरुवातीच्या स्टेपमध्येच उपचार केले तर चांगला परिणाम तुम्हाला दिसेल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Signs of cancer fatigue lumps cough
WhatsApp Update: 8 सप्टेंबरपासून WhatsApp होईल बंद, आत्ताच करा हे काम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com