Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि वाईट प्रसंगात कसं खंबीरपणे उभं राहायचं याचं मार्गदर्शन देत असतात.
चाणक्यांच्या मते, हुशार व्यक्ती कधीच हारत नाही, तर तो हरलेला डाव पुन्हा जिंकून दाखवतो.
चाणक्य म्हणतात, कोणत्याही परिस्थितीतून सावरण्याची पहिली पायरी म्हणजे आपण का हरलो हे समजून घेणं आणि त्यावर नियोजन करुन काम करणं.
बऱ्याचदा आपण लावला अंदाज चुकीचा ठरु शकतो. त्यामुळे तुम्ही शत्रूला कमी लेखण्याचा प्रयत्न करु नका.
घाईगडबडीत घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरतात. योग्य वेळेची वाट पाहणं आवश्यक आहे.
तुमचे प्लॅन्स आणि पुढील पावलं सर्वांना सांगत बसू नका. योग्य वेळीच त्याचा वापर करा.
आत्मविश्वास हरवला तर जिंकण्याची शक्यता कमी होत जाते. त्यामुळे सकारात्मक विचार महत्वाचे आहेत.
प्रत्येक अपयश हे शिकवण देतं. त्यातून धडा घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे.