Blood Pressure : सावधान! उन्हाळ्यात अचानक ब्लड प्रेशर वाढतो? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Dehydration and BP: उन्हाळ्यात वाढलेल्या उष्णतेमुळे रक्तदाबात चढउतार होऊ शकतात. डिहायड्रेशन, घाम आणि थकवा यामुळे समस्या वाढतात. त्यामुळे BP रुग्णांनी सूर्यप्रकाश टाळून योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
Heatwave Alert: Essential Tips for BP Patients to Avoid Health Risks
Summer Heat and Blood Pressure: Key Precautions Every Patient Must Followgoogle
Published On

सध्या कडाक्याचं ऊन पडायला सुरुवात झाली आहे. सकाळचे १० वाजले की सुर्य डोक्यावर येतो. घराबाहेर १० मिनिटं जरी पडलं तरी अंग घामाने ओलं होतं. या दिवसात तुम्ही स्वत: ची खूप काळजी घेतली पाहिजे. कारण यात जरी तुम्हाला कोणताही आजार नसेल तरी उन्हाळ्यात चक्कर, डिहायड्रेशन आणि थकवा या सामान्य वाटणाऱ्या समस्या होऊ शकतात.

पण जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुम्ही उन्हाळ्यात काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पुढील माहितीत तज्ज्ञांनी दिलेली महत्वाची माहिती आणि सल्ले जाणून घेणार आहोत. जे प्रत्येक BP च्या रुग्णासाठी महत्वाचे आहेत.

Heatwave Alert: Essential Tips for BP Patients to Avoid Health Risks
Jio Plan : जिओचा भन्नाट रिचार्ज प्लॅन, 329 रुपयांत होणार मोठा फायदा

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे BPचे रुग्ण आहेत. त्यांनी उन्हात बाहेर फिरणं टाळावं. बऱ्याचदा उन्हात आपण फिरतो, पण शरीराची काळजी घेत नाही. याने तुमची अस्वस्थता वाढू शकते. तसेच शरीरातही काही बदल घडू शकतात. यासगळ्याचा परिणाम हा तुमच्या रक्तदाबावर होतो. बऱ्याचदा उन्हाळ्यात अनेकांना ब्लड प्रेशर तपासताना गोंधळ निर्माण होतो.

उन्हाळ्यात ब्लड प्रेशर तपासताना कधी रेडींग अचानक वाढते, तर कधी अचानक कमी होते. कारण उन्हात शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी रक्तवाहिन्या विस्तारतं. यामुळे काही वेळा रक्तदाब कमी होऊ शकतो. त्यामध्ये शरीराला संतुलन राखण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागतं. त्यामुळे थकवा, अशक्तपणा किंवा चक्कर येण्यासारखी लक्षणं जाणवू शकतात. तसेच जर या रुग्णांना उन्हाळ्यात जास्त घाम आला तर त्यांच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. कधीकधी रक्ताची जाडी वाढू शकते आणि BP पुन्हा वाढू शकतो. म्हणूनच काही लोकांना सकाळी आणि संध्याकाळी वेगवेगळे रीडिंग्स दिसून येतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Heatwave Alert: Essential Tips for BP Patients to Avoid Health Risks
EPFO 3.0: PF चे पैसे एटीएम आणि UPI ने काढायला सुरुवात, एका वेळी किती रक्कम काढू शकतो, नियम काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com