EPFO 3.0: PF चे पैसे एटीएम आणि UPI ने काढायला सुरुवात, एका वेळी किती रक्कम काढू शकतो, नियम काय?

PF withdrawal Update: EPFO 3.0 मुळे PF काढणे सोपे झाले असून आता ATM आणि UPIद्वारे काही मिनिटांत पैसे मिळतात. मात्र एका वेळी 50 टक्के रक्कम काढण्याची मर्यादा लागू आहे.
EPFO 3.0
EPFO 3.0Saam Tv
Published On

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनामे मागील वर्षी EPFO 3.0ची सुरुवात केली होती. याचा फायदा निवृत्ती संस्थेच्या सिस्टीमला झाला आहे. तसेच याने PF काढणं सुद्धा सोपं झालं आहे. तुम्ही आत्तापर्यंत PF साठी लांबच्या लांब रांगा लावून पैसे काढत होतात. पण आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. ही पद्धत आता सोपी झाली आहे.

EPFO 3.0
WhatsApp Spam Calls: WhatsApp वर अनोळखी नंबरवरुन कॉल येतायेत? फक्त १ सेंकदात करा ही सेटिंग अन् राहा टेन्शन फ्री

तुम्हाला तुमचा निधी थेट तुमच्या खात्यावर मिळण्याची यामध्ये सुविधा केली आहे. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न होता, तो म्हणजे आपण डिजीटली पीएफचे पैसे काढताना किंवा UPI मधून किती निधी काढताना किती रक्कम काढू शकतो? याच्या कोणत्या अटी आहेत का? याबद्दल पुढील माहितीत जाणून घेऊयात.

EPFO 3.0 मध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत. त्यामध्ये भविष्य निर्वाह निधीमध्ये सोप्या पद्धतीने प्रवेश, ऑटो-क्लेम सेटलमेंट, ATM आणि UPIने मिनिटांत पीएफ काढण्याची सुविधा केली गेली आहे. आता कर्मचारी त्यांची पीएफमधली शिल्लक रक्कम सुद्धा चेक करू शकणार आहेत. यामध्ये आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे कर्मचारी एटीएम आणि यूपीआयने पीएफचा निधी काढू शकतात. त्यासाठी १ मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागणार नाही. मात्र यामध्ये काही महत्वाचे नियम आणि अटी असणार आहेत.

पहिली अट म्हणजे तुम्ही UPI किंवा ATMने तुमच्या पीएफची ५०टक्के इतकीच रक्कम काढू शकता. याचं कारण म्हणजे तुम्ही तुमची काही रक्कम शिल्लक ठेवून भविष्यात काही अडचणी आल्यास वापरु शकता. प्रसारित झालेल्या माहितीनुसार EPFO त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ATM कार्डसुद्धा तयार करु शकतं. याने पैसे काढणं सोपं होईल. तसेच तुमच्याकडे UNA नंबर असलेलं आधार कार्ड, बॅंक खाते क्रमांक आणि बॅंकेचा IFSC कोड असणं गरजेचं असणार आहे.

EPFO 3.0
Honey Benefits: रोज १ चमचा मध खाल्याने शरीराला कोणतं Vitamin मिळतं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com