Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणते? आताच वाचून घ्या

Akshaya Tritiya 2026 Gold Buying Guide: अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही सोनं खरेदीचा प्लान करत असाल तर शुभ मुहूर्त कोणते ते पाहूनच खरेदीसाठी जा...
Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणते? आताच वाचून घ्या
Gold Saam tv
Published On

Summary -

  • अक्षय तृतीया हा सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो

  • या दिवशी केलेली खरेदी समृद्धी आणि यशाचे प्रतीक असते

  • दिवसभर शुभ मुहूर्त असतो, तरीही विशिष्ट वेळा अधिक शुभ मानल्या जातात

  • सोनं खरेदीला जाण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहून जाणे योग्य राहिल

अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक मोठा सण मानला जातो. हा सण केवळ एक परंपरा नसून समृद्धी आणि नवीन सुरुवातीसाठी एक अद्भुत संधी आहे. या दिवशी केलेली शुभ कार्ये कधीही संपत नाहीत असे मानले जाते. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानले जाते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदीकडे अनेकांचा कल असतो. अक्षय तृतीया १९ एप्रिल रोजी म्हणजे रविवारी आहे. या दिवशी सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी तुम्ही शुभ मुहूर्त कोणते आहेत ते पाहून जा...

अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णू, लक्ष्मी देवी आणि भगवान गणेश यांची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. सोनं खरेदी केल्यामुळे नक्कीच नशीब उजळते. सोनं खरेदी केल्याने घरात समृद्धी आणि आनंद येतो असे म्हटले जाते. त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी आवर्जुन अनेक जण सोनं खरेदी करायला जातात. पण सोनं खरेदी करताना शुभ मुहूर्त पाळणं देखील महत्वाचे मानले जाते. शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करणं चांगले असते असे म्हटले जाते.

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणते? आताच वाचून घ्या
Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा बदलले, प्रति तोळा इतक्या रुपयांवर पोहचलं; वाचा २२ अन् २४ कॅरटचे दर

१९ एप्रिल रोजी सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणते?

- सकाळी १०:४९ ते दुपारी १२:२०

- दुपारी ०१:५८ ते दुपारी ०३:३५

- संध्याकाळी ०६:४९ ते रात्री १०:५७

- रात्री - ०१:४३ ते पहाटे ०३:०५ (२० एप्रिल)

- पहाटे - ०४:२८ ते सकाळी ०५:५१

- सकाळी- ५.५१ ते सकाळी७.२७ (२० एप्रिल)

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणते? आताच वाचून घ्या
Gold Price 2026: १ तोळा सोनं १.५५ लाखांवर, ५ वर्षांपूर्वी फक्त इतकी होती किंमत; वाचा

संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असलेले सोनं नेहमीच प्रतिष्ठा आणि ऐश्वर्याचे प्रतीक राहिले आहे. लोकांचा असा विश्वास आहे की, अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी केलेले सोनं घरात आनंद आणि शांती आणते. अक्षय तृतीयाच्या दिवशी ग्रहांची स्थिती खूप चांगली आहे म्हणजेच हेतू आणखी मजबूत होतो. सोनं खरेदीची ही प्रथा खूप जुनी असून ती शुभतेचे प्रतीक मानली जाते. सध्याच्या काळात सोने आता केवळ एक परंपरा राहिलेली नाही तर ती एक चांगली आणि सुरक्षित गुंतवणूक देखील आहे.

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणते? आताच वाचून घ्या
Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात घसरण; १० तोळ्यामागे २३,४०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

तिथी आणि पूजा वेळा-

तृतीया तिथी प्रारंभ: १९ एप्रिल, २०२६, सकाळी १०:४९ वाजता

तृतीया तिथी समाप्ती: २० एप्रिल, २०२६, सकाळी ०७:२७ वाजता

पूजेसाठी शुभ वेळ: सकाळी १०:४९ ते दुपारी १२:२०

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणते? आताच वाचून घ्या
Gold Rate: अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याला चकाकी, १० तोळा सोनं ११००० रुपयांनी महागलं; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com