

प्रत्येकालाच सणावाराला नवे दागिने परिधान करायला आवडतात. त्यात एप्रिल-मे महिना लग्नसराईचा असतो. याकाळात अनेकजण सोनं खरेदी करतात. मग या दिवसांमध्ये येणाऱ्या सणावारांसाठी सुद्धा शुभ मुहूर्तांवर सोनं खरेदी केलं जातं. गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीयेला मोठ्या प्रमाणात लोक सोनं खरेदी करतात. हा अत्यंत शुभ दिवस असतो, असं मानलं जातं. पण तुम्हाला माहितीये का? ५ वर्षांपुर्वी अक्षय्य तृतीयेला सोन्याचा दर हा खूप कमी होता. ज्याची किंमत आता लाखो रुपयांनी वाढली आहे. पुढील बातमीत आपण याबदललेल्या किंमतीबद्दल जाणून घेणार आहोत.
अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त
अक्षय्य तृतीया ही यंदा १९ एप्रिल २०२६ रोजी साजरी केली जाईल. हिंदू पंचांगानुसार या दिवशाच्या शुभ मुहूर्ताची वेळ ही १०.४९ वाजल्यापासून ते २० एप्रिलच्या ७.२७ वाजेपर्यंत असणार आहे.
सोन्यामधील गुंतवणूक
गेल्या ५ वर्षांच्या सोन्याच्या किंमती या सर्वसामान्यांनाही परवडणाऱ्या होत्या. म्हणून लोक दर अक्षय्य तृतीयेला १० ग्रॅम सोन्याचं नाणं खरेदी करायचे. जर ५ नाणी विकत घेतली असतील तर त्याची किंमत ही ३२९,०५० रुपये इतकी झाली असती. तर आज त्यावर तुम्हाला जवळपास ७७५,००० रुपयांचा परतावा मिळाला असता. म्हणजेच तुम्ही तब्बल १३५ टक्के परतावा मिळवू शकला असता.
सोन्याचे मागील ५ वर्षांचे दर
२०२१मध्ये अक्षय्य तृतीयेला सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६, ५०० रुपये होता. २०२२ मध्ये हाच दर ५१, ५१० रुपये झाला. मग २०२३ मध्ये ६१,३०० रुपये, २०२४ मध्ये ७३,२४० आणि २०२५ मध्ये हा दर ९६,५०० झाला होता. सध्याच्या किंमती १० ग्रॅम सोन्याचा दर हा १४४,४१० रुपये इतका झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.