Sakshi Sunil Jadhav
यंदा अक्षय्य तृतीया १९ एप्रिल २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी केलेलं कोणतंही शुभ कार्य कधीही कमी होत नाही असं मानलं जातं.
पुढील बातमीत या दिवशी आपण गृहप्रवेश करणं योग्य किंवा शुभ ठरेल का हे जाणून घेणार आहोत. कारण हा दिवस खूप पवित्र मानला जातो.
अक्षय्य तृतीया हा सर्वसिद्ध मुहूर्त मानला जातो. या दिवशी स्वतंत्र मुहूर्त काढण्याची आवश्यकता नसते.
अक्षय्य तृतीया हा दिवस देवी लक्ष्मीशी संबंधित मानला जातो. गृहप्रवेश केल्याने धन-धान्य आणि समृद्धी वाढते असं मानलं जातं.
नवीन घरात प्रवेश म्हणजे आयुष्याची नवीन सुरुवात असते. त्यामुळे हा दिवस नव्या सुरुवातीसाठी अत्यंत सकारात्मक ऊर्जा देणारा ठरू शकतो.
तुम्ही या दिवशी पूजा केलीत तर घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरातले वास्तुदोष कमी होतात असं मानलं जातं.
अक्षय्य तृतीयेला केलेली गुंतवणूक किंवा खरेदी वाढीस लागते. नवीन घरात प्रवेश केल्याने आर्थिक स्थिती सुधारते.
अक्षय्य तृतीया दिवशी अनेक शुभ योग तयार होतात. यामुळे हा गृहप्रवेशासाठी हा दिवस अधिक मंगलमय ठरु शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.