Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा बदलले, प्रति तोळा इतक्या रुपयांवर पोहचलं; वाचा २२ अन् २४ कॅरटचे दर

Gold Rate Today Hike: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात १,९६० रुपयांची वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर.
Gold Price Today
Gold Price TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर वाढले

सोन्याच्या दरात १९६० रुपयांची वाढ

सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होती. ऐन लग्नसराईत सोन्याचे दर सातत्याने बदलताना दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे.मागच्या आठवड्यात सोन्याचे दर घसरले होते. मात्र, या आठवड्यात सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. सोन्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे.

Gold Price Today
Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदी ५ हजारांनी वाढली ;वाचा सुवर्णनगरीतले आजचे दर

गेल्या अनेक दिवसापासून ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली आहे. मात्र, लग्नसमारंभात सोनं खरेदी करणे आवश्यक असते. आज सोन्याचे दर दीड लाखांवर पोहचले आहेत. आज प्रति तोळ्यामागे १,९६० रुपयांची वाढ झाली आहे.जाणून घ्या आजचे सोन्याचे दर.

आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर १९६० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,५०,९३० रुपये झाले आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर १,५६८ रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२०,७४४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १९,६०० रुपयांनी वाढले असून हे दर १५,०९,३०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचे दर १८०० रुपयांनी वाढले आहेत. प्रति तोळ्याचे दर १,३८,३५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं १,४४० रुपयांनी महागलं असून हे दर १,१०,६८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे १८,००० रुपयांची वाढ झाली असून हे दर १३,३८,५०० रुपये झाले आहेत.

Gold Price Today
Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदी ५ हजारांनी वाढली ;वाचा सुवर्णनगरीतले आजचे दर

१८ कॅरेटचे दर (18K Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,४७० रुपयांची वाढ झाली असून हे दर १,१३,२०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,१७६ रुपयांनी वाढले असून ९०,५६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं १४,७०० रुपयांनी महागलं असून हे दर ११,३२,००० रुपये झाले आहेत.

Gold Price Today
Gold Rate: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ४०००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com