Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदी ५ हजारांनी वाढली ;वाचा सुवर्णनगरीतले आजचे दर

Jalgaon Gold Rate Today News : जळगाव सुवर्ण बाजारात सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात वाढ. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या प्रभावामुळे दरात चढ-उतार; लग्नसराईत ग्राहक संभ्रमात.
Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदी ५ हजारांनी वाढली ;वाचा सुवर्णनगरीतले आजचे दर
Gold Rate Today NewsSaam Tv
Published On
Summary
  • जळगाव बाजारात सोन्याच्या दरात घसरण

  • चांदीच्या दरात ५ हजारांची वाढ

  • लग्नसराईमुळे दागिन्यांची मागणी वाढली

  • दरातील चढ-उतारामुळे ग्राहक गोंधळले

संजय महाजन, जळगाव

शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दिवसेंदिवस सोनं, चांदीच्या दरात सतत मोठा बदल होत असून, लग्नसराई तसेच सणासुदीसाठी दागिने खरेदीच्या विचारात असलेले ग्राहक संमभ्रमात पडले आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दारात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली मात्र आता सुवर्णनगरीत या सोन्याच्या दारात मोठी घसरण पाहायला मिळत असून चांदीच्या दारात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

आज सोन्याच्या दरात काहीअंशी घट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव आणि डॉलरच्या हालचालींमुळे सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. सुवर्ण नगरी मानल्या जाणाऱ्या जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५०,८८० रुपयांपर्यंत पोहचले होते.

Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदी ५ हजारांनी वाढली ;वाचा सुवर्णनगरीतले आजचे दर
Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?

आज म्हणजेच मंगळवारी सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५०,३८० रुपयांपर्यंत घसरले आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी चांदीचे भाव घसरले होते. सोमवारी चांदीचे दर २,४२,२०० होते. मात्र, मंगळवारी चांदीच्या दारात ५ हजारांची वाढ झाली असून आज चांदीचे दर जीएसटीसह २,४७ ,२०० वर पोचली आहे.

Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदी ५ हजारांनी वाढली ;वाचा सुवर्णनगरीतले आजचे दर
Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

दरम्यान सर्वत्र लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी कायम आहे. मात्र, सोन्या चांदीच्या किमतींती होणाऱ्या सततच्या चढ-उतारामुळे ग्राहक आणि व्यापारी गोंधळलेले पाहायला मिळत आहेत. काही ग्राहक भविष्यातील संभाव्य दरवाढ लक्षात घेऊन तत्काळ खरेदी करत आहेत, तर काहीजण आणखी घसरणीची अपेक्षा ठेवत थांबण्याचा निर्णय घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com