Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?

Bihar Nalanda News : बिहारच्या नालंदामध्ये महिलेशी सार्वजनिक ठिकाणी छळ केल्याची संतापजनक घटना. दोन आरोपी अटकेत, एक फरार; पोलिसांकडून तपास सुरू असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.
Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?
Bihar Nalanda NewsSaam tv
Published On
Summary
  • नालंदात महिलेशी छळाची संतापजनक घटना

  • तीन आरोपींपैकी दोघांना अटक, एक फरार

  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

  • महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण

बिहारच्या नालंदामधून संतापजनक घटना समोर आली आहे. भररस्त्यात महिलेला गाठून तीन तरुणांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे तिचे कपडे फाडून चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर टाकण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असून, एक जण अद्याप फरार आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून ती तिच्या आई-वडिलांच्या घरी राहत होती. २६ मार्च रोजी, सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान, ती किराणा सामान घेऊन घरी परत येत असताना तिन्ही आरोपींनी तिला पकडले. तिने प्रतिकार केल्यावर त्यांनी तिला जमिनीवर पाडले आणि तिचे कपडे फाडले.

Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?
Political News : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

तेव्हा त्या महिलेने आरडाओरडा केला. पीडितेच्या आवाजाने आजूबाजूची मंडळी जमा झाले, परंतु आरोपींच्या आक्रमक स्वभावामुळे कोणीही उघडपणे त्यांना विरोध करू शकले नाही. आरोपींनी पीडित महिलेचा सगळ्यांसमोर छळ केला आणि सोशल मीडियावर दोन व्हिडिओ शेअर केले.

Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?
Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!

नूरसराई पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस तपास सुरु आहे. अशोक यादव, मातृ महतो आणि रविकांत कुमार अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी कारवाई करत मातृ महतो आणि अशोक यादव यांना अटक केली असून, तिसरा आरोपी रविकांत कुमार याचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com