Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!

Mumbai Vasai News : वसईत ४ वर्षांच्या मुलाला रिक्षाचालकाने निर्दयीपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना. CCTV फुटेज व्हायरल झाले असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!
Mumbai Vasai NewsSaam tv
Published On
Summary
  • वसईत ४ वर्षांच्या मुलाला निर्दयीपणे मारहाण

  • रिक्षाचालकाने वडिलांच्या वादाचा राग मुलावर काढला

  • CCTV फुटेज व्हायरल; आरोपीवर गुन्हा दाखल

  • मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली

मनोज तांबे, वसई

वसईतून माणुसकीला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. एका रिक्षाचालकाने चार वर्षाच्या मुलाला निर्दयीपणे मारहाण केली आहे. धक्कादायक म्हणजे पीडित मुलाच्या वडिलांचं आणि रिक्षाचालकाच भांडण झालं असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना वसई पश्चिम येथील अनुपमा सोसायटी बाहेर घडली आहे. तसेच आरोपी रिक्षाचालकाने नाव संदीप पवार असे आहे. तर जखमी मुलाचे नाव विघ्नेश असे आहे. संदीप पवार याचा विघ्नेशच्या वडिलांसोबत काही दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर संदीप पवारच्या मनात तो राग खदखदत होता. हा राग संदीपने विघ्नेशवर काढला.

Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!
Shocking : बाई, काय हा प्रकार... पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी तरुणाने देवीला घातलं साकडं; नवस पूर्ण होताच काय केलं? वाचा

विघ्नेश सोसायटी बाहेर खेळत असताना संदीप त्याच्याजवळ गेला. त्यानंतर संदीपने विघ्नेशच डोकं रिक्षाच्या लोखंडी रोडला जोरात आपटलं आणि रस्त्यावर जोरदार फरफडत नेवून कपडे धोपटावे तसे विघ्नेशला रस्त्यावर आपटलं. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे.

Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!
Political News : खासदार होताच आमदारकीचा राजीनामा दिला, मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार?

संदीपच्या या निर्दयीपणामुळे विघ्नेश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने भाईंदरच्या ओढकार या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सध्या विघ्नेशवर रुग्णालयात उपचार सुरु असून या प्रकरणात संदिपवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com