जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण
सोनं ४ हजार रुपयांनी स्वस्त
चांदी १५ हजार रुपयांनी घसरली
जळगाव सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी
अमेरिका- इस्राइल आणि इराण या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पण त्यानंतर सोन्याचे दर वाढत चालले आहेत. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये बुधवारी सोनं-चांदीच्या भावात वाढ झाली होती. मात्र आज चांदीमध्ये तब्बल १५ हजार रुपायंनी आणि सोन्याचे ४ हजार रूपयांनी स्वस्त झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आज सोनं- चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सोनं-चांदीच्या दरात सतत वाढ होत असल्यामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती. पण आज सोनं-चांदीचे दर घसरल्यामुळे ग्राहकांनी जवळगावच्या सराफा बाजारात मोठी गर्दी केली आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे ३१ मार्चला देखील दर वाढले होते. तर नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी देखील सोन्याच्या दरात ४ हजार रुपयांनी आणि चांदीच्या दरामध्ये ५ हजार रुपयांनी वाढ झाली होती. मात्र आज सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदीच्या दरात वाढ झाली होती. बुधवारी ४ हजारांची वाढ होऊन सोन्याचे विनाजीएसटी दर प्रतितोळा १ लाख ५० हजार रुपये झाले होते. तर चांदीच्या दरात ५ हजार रुपयांची वाढ होऊन प्रतिकिलो चांदी विनाजीएसटी २ लाख ४५ हजार रुपये झाली होती. आज मार्केट उघडताच खरेदीदारांना दिलासा मिळाला. चांदीचे दर तब्बल प्रतिकिलो १५ हजार रूपयांनी स्वस्त होऊन २ लाख ३० हजार रूपयांवर आले आहेत. तर १ तोळा सोन्याच्या दरात ४ हजारांनी घसरण होऊन हे सोनं १ लाख ५० हजारावरून १ लाख ४६ हजार रूपयांवर आले आहेत.
२९ मार्च - १ लाख ४५ हजार
३० मार्च - १ लाख ४५ हजार
३१ मार्च - १ लाख ४६ हजार
१ एप्रिल - १ लाख ५० हजार
२ एप्रिल - १ लाख ४६ हजार
२९ मार्च - २ लाख ४० लाख
३० मार्च - २ लाख ४० लाख
३१ मार्च - २ लाख ४० लाख
१ एप्रिल - २ लाख ४५ लाख
२ एप्रिल - २ लाख ३० लाख
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.