Gold Rate Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; १० तोळ्यामागे १५,३०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today Fall: सोन्याचे दर काल वाढले होते. त्यानंतर आज सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. प्रति तोळ्यामागे दीड हजारांची घसरण झाली आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर पुन्हा घसरले

प्रति तोळ्यामागे दीड हजारांची घसरण

सोन्याचे दर घसरल्याने खरेदीदारांना दिलासा

सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. काल सोन्याचे दर वाढले होते. त्यानंतर आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे दर आज प्रति तोळ्यामागे दीड हजारांनी घसरले आहेत.ऐन लग्नसराईत सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर आज दीड लाखांवर गेले आहेत. वाचा आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today
Gold Rate Today: महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; २२ अन् २४ कॅरेटसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा

२४ कॅरेटचे दर (24K Gold Rate Today)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर १५३० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,५१,४२० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं १,२२४ रुपयांनी स्वस्त झाल असून हे दर १,२१,१३६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १५,३०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १५,१४,२०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,४०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,३८,८०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,१२० रुपयांनी घसरले असून १,११,०४० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे १४,००० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १३,८८,००० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Today: महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; २२ अन् २४ कॅरेटसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर १,१४० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१३,५७० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ९१२ रुपयांनी घसरले असून ९०,८५६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ११,४०० रुपयांनी घसरले असून ११,३५,७०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Today: ...म्हणून सोन्याचे दर पुन्हा वाढले, प्रति तोळा इतक्या रुपयांवर पोहचले, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com