Gold Rate Today: महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; २२ अन् २४ कॅरेटसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा

Gold Rate Today Hike: सोन्याचे नवीन दर जाहीर झाले आहेत. आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मागच्या आठवड्यात सोन्याचे दर चांगलेच घसरले होते. त्यानंतर पुन्हा वाढ होत असल्याने खरेदीदारांना फटका बसत आहे.
Today's Gold Rate
Today's Gold RateSaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर पुन्हा वाढले

सोन्याचे दर १,०३० रुपयांनी वाढले

सोन्याचे दर वाढल्याने खरेदीदारांना फटका

सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. काल आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर घसरले होते त्यानंतर आज सोन्याचे दर वाढले आहेत. मागच्या आठवड्यात सोन्याचे दर चांगलेच घसरले होते. त्यानंतर आता सोन्याचे दर पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

Today's Gold Rate
Gold rate today : सोन्याला पुन्हा चकाकी; १० तोळे सोन्याचा दरात २५१०० रुपयांनी वाढ, काय आहे आजचा दर?

आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,०३० रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचे दर पुन्हा वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. लग्नसराईच्या काळात पुन्हा सोन्याचे दर वाढायला लागल्याने खरेदीदारांना टेन्शन आलं आहे. जाणून घ्या आजचे सोन्याचे दर

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १०३० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,४९,२९० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ८२४ रुपयांनी वाढले असून हे दर १,१९,४३२ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे १०,३०० रुपयांची वाढ झाली आहे हे दर १४,९२,९०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ९५० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,३६,८५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ७६० रुपयांनी वाढले आहे. हे दर १,०९,४८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ९,५०० रुपयांनी वाढले असून हे दर १३,६८,५०० रुपये झाले आहेत.

Today's Gold Rate
Gold Rate : चांदी तब्बल ₹३१००० नी स्वस्त, सोन्यातही मोठी घसरण, वाचा 24k आणि 22k चे दर

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ७८० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,११,९७० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ६२४ रुपयांनी वाढले आहेत. हे दर ८९,५७६ झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे भाव ७८०० रुपयांनी वाढून ११,१९,७०० रुपये झाले आहेत.

Today's Gold Rate
Gold Rate : ऐन लग्नसराईत चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किमतीतही मोठा बदल; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com