

१ तोळा सोन्याच्या दरात २५१० रुपयांची वाढ
एक किलो चांदी ५,००० रुपयांनी महागली
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने १,४८,०९० रुपये प्रति तोळा झालंय
Gold rate : सराफा बाजारात सोने-चांदीमध्ये पुन्हा भाववाढ झाली आहे. १ तोळा सोन्याचा दरात २५१० रुपयांनी वाढ झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात तब्बल ५ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. अमेरिका-इराण युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर पाहायला मिळत आहे.
अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने-चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात आज शनिवारी पुन्हा भाववाढ झाली आहे. १ तोळ्यामागे सोन्याच्या दरात २५१० वाढ झाली आहे. तर १० तोळ्यामागे २५१०० रुपयांची वाढ झाली आहे. बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव १४८०९० रुपये प्रति तोळा इतका झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १३५५७५ रुपयांवर पोहोचला आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर १११०७० रुपये इतका झाला आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव
२४ कॅरेट सोन्याचा भाव १४९०९ रुपये प्रति ग्रॅम इतका झालाय. मागील दिवसाच्या तुलनेत १ ग्रॅम सोन्याचा दरात २५१ रुपयांनी वाढ ढाली आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १४८०९० रुपये प्रति ग्रॅम इतका झाला आहे. सोन्याचा दर कालच्या तुलनेत २५१० रुपयांनी वाढला आहे.
२२ कॅरेट सोन्याचा दर
२२ कॅरेट सोन्याचा भाव १३५७५ रुपये प्रति ग्रॅम इतका आहे. कालच्या किंमतीत २३० रुपयांनी वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव १३५७५० रुपये प्रति ग्रॅम इतका झाला आहे. कालच्या तुलनेत २३०० रुपयांनी वाढ झाली आहे.
चांदीच्या दरातही वाढ
सोन्यानंतर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. एक किलो चांदीच्या दरात ५ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. १ किलो चांदीचा भाव २४५००० इतका झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.