Gold Rate Today: खुशखबर! सुवर्णनगरीत सोनं झालं स्वस्त; दर ६००० रुपयांनी घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Gold Rate Today Fall: सोन्याच्या दरात आज चांगलीच घसरण झाली आहे. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४००० रुपयांनी घसरले आहेत. सोन्याचे दर घसरल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सुवर्णनगरीत सोन्याचे दर घसरले

सोनं ६००० रुपयांनी घसरलं

चांदी ४००० रुपयांनी स्वस्त

सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याचे दर आज पुन्हा एकदा घसरले आहेत. सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिवासा मिळाला आहे. सोने चांदीच्या दरात घसरण सुरु असल्याचे दिसत आहे. जळगावात गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात चार हजारांची घसरण पाहायला मिळाली तर चांदीचे दर ६००० रुपयांनी घसरले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Today: गुढीपाडव्याला सकाळीच सोन्याच्या दरात बदल; वाचा आजचे २४ कॅरेटचे दर

गेल्या काही दिवसांपासून आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम हा संपूर्ण जगाच्या विविध क्षेत्रावर पडत आहे. याचा परिणाम जळगाव मधील सुवर्णनगरीवर ही पडताना दिसत आहे. डॉलर इंडेक्स दिवसागणिक वाढत असताना रुपयाची नीचांकी पातळीवरील घसरण मुळे सोन्याच्या दरात घसरण होत असल्याच पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर घसरत असल्याने खरेदीदारांना मात्र दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.

काल जळगाव सुवर्ण नगरी मध्ये सोन्याचे दर १४८००० होते.या दरात आज चार हजार रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,४४,००० झाले आहेत.तर चांदीच्या दरात देखील सहा हजार रुपयांची घसरण होऊन चांदीचे दर हे २३६००० वरून २३०००० इतके झाले आहेत. युद्धाची तीव्रता अशीच कायम राहिली तर सोने चांदीच्या दरात अजूनही घसरण होण्याचा अंदाज सुवर्ण व्यासायिक व्यक्त करत आहेत.

Gold Rate Today
Gold Rate : गुढीपाडवा धमाका! २४ तासांत सोनं ४ हजारांनी स्वस्त, तर चांदी १३ हजारांनी स्वस्त; पाहा आजचे दर

आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)

22k १३१९००

24k १४४०००

चांदी २३००००

सोन्याच्या दरात मागच्या वर्षभरापासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर आता या दरात घसरण सुरु झाल्याने खरेदीदारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. सोन्याच्या दरात भविष्यात अशीच घसरण व्हावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. सोन्याचे दर जर कमी झाले तर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढू शकते.

Gold Rate Today
Gold Rate Today: सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २९४०० रुपयांनी स्वस्त, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com