Gold Rate : चांदी तब्बल ₹३१००० नी स्वस्त, सोन्यातही मोठी घसरण, वाचा 24k आणि 22k चे दर

Weekly Gold Rate News : गेल्या १० दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून मुंबईत सोनं स्वस्त झालं आहे. लग्नसराईच्या काळात ग्राहक आणि गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
Gold Rate : चांदी तब्बल ₹३१००० नी स्वस्त, सोन्यातही मोठी घसरण, वाचा 24k आणि 22k चे दर
Weekly Gold Rate NewsSaam tv
Published On
Summary
  • १० दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • प्रति १० ग्रॅम १३ हजारांहून अधिक घट

  • चांदीच्या दरातही मोठी घसरण

  • ग्राहक आणि गुंतवणूकदारांसाठी संधी

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत.या काळात सोनं खरेदीवर जास्त भर दिला जातो. मात्र आत ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या १० दिवसांत सोन्याचे भाव घसरले आहेत. यामुळे ग्राहक तसेच अनेक गुंतवणूकदार याकडे संधी म्हणून पाहत आहेत. विशेषतः १६ मार्च ते २७ मार्च या कालावधीत सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १३,४९४ रुपयांची आणि चांदीच्या दरात प्रति किलो ३१,१४६ रुपयांची घसरण नोंदवली आहे. ही माहिती इंडियन बुलियन ज्वेलर्स असोशिएनने प्रसिद्ध केली आहे.

मुंबईतील आजचे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) (Mumbai Today Gold Rate )

२४ कॅरेट - १,४८,०९० रुपये

२२ कॅरेट - १,३५,७५० रुपये

१८ कॅरेट - १,११,०७० रुपये

Gold Rate : चांदी तब्बल ₹३१००० नी स्वस्त, सोन्यातही मोठी घसरण, वाचा 24k आणि 22k चे दर
Shocking : जिम ट्रेनरचा झुडपात आढळला मृतदेह, १४ दिवसांपासून होता बेपत्ता; सोलापुरात खळबळ

२७ मार्च २०२६ रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १४२,९४२ रुपये इतका होता. याच तुलनेत १६ मार्च रोजी हा भाव १,५६,४३६ रुपये होता. तसेच चांदीच्या बाबतीतही चित्र वेगळे नव्हते. १६ मार्चच्या सकाळी एक किलो चांदीचा दर २५२,७९३ रुपये होता, तो २७ मार्चला २२१,६४७ रुपयांवर आला.

Gold Rate : चांदी तब्बल ₹३१००० नी स्वस्त, सोन्यातही मोठी घसरण, वाचा 24k आणि 22k चे दर
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचं इंटरनॅशनल कनेक्शन; परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाल्याचा वापर?

ही वाढ मुख्यतः जागतिक घटनांमुळे घडली. दरम्यान, गेल्या आठवड्यात मात्र सोने आणि चांदी दोन्हींच्या भावात उल्लेखनीय वाढ झाली होती. २३ रोजी सकाळी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १३५,१४१ रुपये होता. सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांत तो ८,५७४ रुपयांनी वाढून २७ मार्चला १४२,९४२ रुपयांवर पोहोचला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com