Shukra Gochar: शुक्राचं मिथुन राशीत होणार गोचर; 25 दिवस या ३ राशींच्या जीवनात येणार अडथळे

Venus transit 2026: १४ मे २०२६ रोजी शुक्र मिथुन राशीत प्रवेश करणार असून त्याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. विशेषतः कर्क, मकर आणि मीन राशीच्या लोकांनी आर्थिक, आरोग्य आणि कौटुंबिक समस्यांबाबत सावध राहण्याची गरज आहे.
Shukra Gochar
Shukra Gocharsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा प्रेम, सुखसोयी, संपत्ती, सौंदर्य आणि वैवाहिक जीवनाचा घटक मानला जातो. ज्यावेळी शुक्र त्याच्या राशीत बदल करतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व व्यक्तींच्या आयुष्यावर होत असतो.

१४ मे २०२६ रोजी शुक्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे सर्व राशींवर परिणाम होणार आहे. दरम्यान काही राशींसाठी हे गोचर फारसं चांगलं नसणार आहे. चला जाणून घेऊया की, या काळात कोणत्या राशींना विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

Shukra Gochar
Chandra Gochar 2026: चंद्र करणार बुधाच्या नक्षत्रात प्रवेश; या ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी, शुक्र हा चतुर्थ आणि अकराव्या घराचा स्वामी मानला जातो. या गोचरादरम्यान, शुक्र तुमच्या बाराव्या घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात खर्चात अनपेक्षित वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे इतरांशी वाद होऊ शकतात.

मकर रास

मकर राशीसाठी शुक्र हा एक शुभ ग्रह मानला जातो. मात्र या काळात आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. विशेषतः पोट, त्वचा, रक्तदाब किंवा सूज यांच्याशी संबंधित समस्या. जर शुक्राची मंगळासोबत युती झाली तर राग आणि मानसिक ताण वाढू शकतो. नियमित व्यायाम आणि वेळेवर विश्रांती घेणे फायदेशीर ठरेल.

Shukra Gochar
Surya Gochar: सूर्याचं वृषभ राशीमध्ये होणार गोचर; 15 मे पासून या 4 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

मीन रास

कौटुंबिक जीवनात गैरसमज वाढू शकतात. मीन राशीसाठी, शुक्र तिसऱ्या आणि आठव्या घराचा स्वामी आहे. मिथुन राशीतून गोचर करत असताना, शुक्र तुमच्या चौथ्या घरात प्रवेश करणार आहे. या काळात कुटुंबातील सदस्यांमधील संवादाच्या अभावामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. लहानसहान बाबींवरून होणारे वाद वाढण्याची शक्यता आहे.

Shukra Gochar
Mangal Gochar 2026: सूर्याच्या नक्षत्रात मंगळ ग्रह करणार गोचर; या ३ राशी कमावणार भरपूर पैसा

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com