

चंद्र हा एक शुभ ग्रह आहे, ज्याच्या राशी किंवा नक्षत्रातील बदलांचे सर्व राशींच्या व्यक्तींवर शुभ किंवा अशुभ परिणाम होतात. मन आणि मातेचं प्रतीक असलेला चंद्र, शुक्रवार २४ एप्रिल म्हणजेच रात्री ८:१३ वाजता बुधाच्या आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
चंद्र या राशीत २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:०४ वाजेपर्यंत या नक्षत्रात राहणार आहे. चंद्राच्या आश्लेषा नक्षत्रातील गोचरचा काही राशींना अत्यंत शुभ परिणाम होणार आहे. यावेळी त्यांना मानसिक शांती, संपत्ती आणि यश प्राप्त होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.
कर्क राशीच्या लोकांसाठी आश्लेषा नक्षत्रातील चंद्राचं गोचर शुभ ठरू शकणार आहे. त्यांचे प्रेमजीवन सामान्य राहणार आहे. व्यक्ती भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत होणार आहे. त्यांना त्यांच्या नोकरीत उच्च पद मिळू शकणार आहे. शिवाय संपत्तीत वाढ होणार आहे.
चंद्राचं गोचर कन्या राशीसाठी शुभ काळ घेऊन येणार आहे. करिअरमध्ये प्रगती होईल आणि नोकरी बदलण्याची शक्यता निर्माण होणार आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. ध्येय साध्य करण्याचा मार्ग मोकळा होईल. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
चंद्राच्या गोचरामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकणार आहे. त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे. त्यांना कामाच्या ठिकाणी आणि सहकाऱ्यांकडूनही मदत मिळणार आहे. आर्थिक फायद्यासाठी प्रवास करण्याची गरज भासू शकते.
Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.