

१५ मे रोजी ग्रहांचा राजा सूर्य त्याच्या राशीत बदल करणार आहे. या दिवशी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीचा स्वामी शुक्र आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्राला संपत्ती, समृद्धी यांचा कारक म्हटलं जातं.
एक वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, ज्योतिषी अरुणेश कुमार शर्मा यांच्या मते, वृषभ राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्य चार राशींवर आपली शुभ दृष्टी टाकणार आहे. सूर्य वृषभ राशीत असताना एक अतिरिक्त महिनाही असणार आहे. यावेळी सूर्याच्या गोचरचा कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.
सूर्य तुमच्या राशीच्या लग्न स्थानात प्रवेश करणार आहे. शुक्र या राशीचा स्वामी आहे. परिणामी, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकणार आहे. तुम्हाला स्थावर मालमत्ता, नवीन घर किंवा वाहनाचे लाभ मिळू शकतात. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचे लाभही मिळू शकतात. कर्जाचे पैसे परत मिळू शकतात.
सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य आहे. त्यामुळे घरात नवीन आनंद अनुभवायला मिळणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा राहण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीही सुधारेल. ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतेय. त्यांच्या अडचणी लवकरच दूर होणार आहेत.
वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थितीही सुधारणार आहे. व्यावसायिकांचा नफा दुप्पट होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता आहे. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. तुमच्या कामाप्रती असलेल्या समर्पणाचा सकारात्मक परिणाम होणार आहे. तुमची सामाजिक प्रतिमा मजबूत होईल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात.
ऊर्जा आणि आत्मविश्वास दोन्ही उच्च असतील, ज्यामुळे तुमच्या करिअरला मोठा फायदा होणार आहे. सूर्याच्या गोचरचा तुमच्या उत्पन्नावर किंवा बचतीवर परिणाम होणार आहे. तुम्हाला अतिरिक्त आर्थिक संसाधने मिळू शकतात. आरोग्य चांगलं राहणार आहे.
Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.