

ज्योतिषशास्त्रात अक्षय योगा खूप शुभ मानला जातो. ज्यावेळी सूर्य आणि चंद्र दोन्ही त्यांच्या सर्वात मजबूत स्थितीत असतात तेव्हा हा योग तयार होतो. 19 एप्रिल रोजी सूर्य मेष राशीत असेल आणि चंद्र वृषभ राशीत असणार आहे.
वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, अक्षय योगाची निर्मितीने काही राशींच्या आयुष्यात नव्याने आनंद येणार आहे. यावेळी 4 राशींना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. ज्यामुळे त्यांचं करिअर आणि आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.
मेष राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास वाढेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते आणि भविष्यात नवीन जबाबदाऱ्या मिळाल्याने फायदा होणार आहे. व्यवसायात चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही योग्य ठिकाणी पैसे लावून चांगला नफा कमवू शकाल.
तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहणार आहे. यावेळी तुम्ही तुमच्या आवडीची जमीन किंवा कार खरेदी करू शकता. पैशाचे नवे मार्ग खुले होणार आहेत. तुम्ही जे काही नवीन काम सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे.
सिंह राशीसाठी हा काळ वरदासारखा आहे. नशीब तुमच्या पाठीशी असेल आणि जुनी रखडलेली कामे पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी हा खूप चांगला काळ आहे, एक मोठा करार निश्चित केला जाऊ शकतो.
तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकतात. जुन्या मालमत्ता किंवा जुन्या गुंतवणूकीचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. ज्यांना परदेशात जायचे आहे त्यांना चांगली बातमी मिळू शकणार आहे. नोकरीतील पदोन्नतीची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.