

ऊर्जा, धैर्य आणि आत्मविश्वासाचा ग्रह असलेला मंगळ ग्रह लवकरच सूर्याच्या कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मंगळ १६ जून २०२६ रोजी सकाळी ९:४० वाजता कृत्तिका नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. मंगळ तब्बल ५ जुलै २०२६ पर्यंत या नक्षत्रात राहणार आहे.
ग्रहांच्या नक्षत्र गोचरचा देखील प्रत्येक राशींवर काही ना काही परिणाम होत असतो. या गोचरामुळे काही राशींना शुभ फळ मिळू शकणार आहे. यावेळी त्या राशींना चांगला पैसा आणि करियरमध्ये चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.
मंगळाचं हे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरू शकणार आहे. त्यांचा आत्मविश्वास आणि शारीरिक ऊर्जा वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनपेक्षित नफा होण्याची शक्यता आहे. या काळात करियरमध्ये मोठं यश मिळू शकतं.
मंगळाचे हे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकणार आहे. एकेकाळी विस्कळीत झालेल्या गोष्टींमध्ये सुधारणा होणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. धार्मिक कार्यांमधील तुमची आवड वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची नेतृत्व क्षमता वाढणार आहे.
मंगळाचा कृत्तिका नक्षत्रातील प्रवेश वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. त्यांना उत्साही वाटणार आहे. यावेळी तुम्ही घाईघाईत निर्णय घेणं टाळा. अचानक झालेल्या आर्थिक लाभाने त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकणार आहे. नातेसंबंध सलोख्याचे राहणार आहे.
Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.