

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा सुख, समृद्धी, प्रेम आणि संपत्तीचा कारक आहे. शुक्राने ११ जून २०२६ रोजी दुपारी २:११ वाजता शनीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश केला आहे. शुक्र २३ जूनपर्यंत या नक्षत्रात भ्रमण करणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, पुष्य नक्षत्रातील शुक्राचं भ्रमण अत्यंत शुभ मानण्यात येतंय. यावेळी, शनीच्या नक्षत्रातील शुक्राचं गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभादायक ठरणार आहे. यावेळी काही राशींना धन आणि प्रेमाच्या बाबतीत मोठं यश मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा हा नक्षत्रातील बदल अत्यंत शुभ ठरणार आहे. त्यांच्या जीवनात एक नवीन ऊर्जा प्रवाहित होणार आहे. ज्यामुळे प्रेमामध्ये यशाचे मार्ग खुले होणार आहेत. करिअरमध्ये जलद प्रगती होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील.
मिथुन राशीसाठी शुक्राचा पुष्य नक्षत्रातील गोचर सकारात्मक ठरू शकणार आहे. प्रेमसंबंध अधिक गोड होणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. बऱ्याच काळापासून रखडलेला पैसा तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या उत्पन्नाची परिस्थिती सुधारणार आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचं शनीच्या राशीत होणारं गोचर शुभ ठरू शकणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळणार आहे. व्यावसायिकांना एखादा मोठा करार मिळू शकतो. आर्थिक बाबींसाठी काळ अनुकूल राहणार आहे.
शुक्राचं गोचर मकर राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. प्रेमातील दुरावा संपुष्टात येऊ शकतो. मानसिक तणाव कमी होणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. तुम्ही आत्मविश्वासाने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुमच्या करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.