Virat Kohli: विराट कोहलीचं 'अल्गोरिदम' पुन्हा रडारवर! परदेशी मॉडेलचा फोटो लाईक केल्याने मीम्सचा पाऊस

Virat Kohli: विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अवनीत कौरनंतर, आता त्याने एका जर्मन इन्फ्लुएन्सरने पोस्ट केलेला फोटो 'लाईक' केला आहे. विराटच्या या 'लाईक'चे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत.
Virat Kohli
Virat KohliSaam Tv
Published On

Virat Kohli: टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली पुन्हा एकदा सोशल मीडियामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या प्रत्येक पोस्टप्रमाणेच त्याने दिलेला ‘लाईक’ देखील अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. गेल्या वर्षी त्याने अवनीत कौरचा एक फोटो लाईक करुन सोशल मीडियावर नव्या चर्चेला उधाण दिलं तर यावेळी देखील असाच एक फोटो लाईक करुन पुन्हा नव्या चर्चेची सुरुवात केली आहे.

गेल्या वर्षी अभिनेत्री अवनीत कौर हिच्या फोटोला ‘लाईक’ केल्यामुळे विराट चर्चेत आला होता. त्या वेळी त्याने “अल्गोरिदममधील तांत्रिक बिघाड” झाल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आता पुन्हा एकदा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या वेळी विराटने जर्मन इन्फ्लुएन्सर लिजलैज हिच्या फोटोला ‘लाईक’ केले आहे. विशेष म्हणजे हा फोटो तीन महिन्यांपूर्वी शेअर करण्यात आला होता, मात्र विराटच्या लाईकमुळे तो पुन्हा व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती पावडर-ब्लू रंगाच्या हॉल्टर-नेक ड्रेसमध्ये पोझ देताना दिसते.

Virat Kohli
Bigg Boss Marathi 6 Winner: बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव फिनालेपूर्वीच लीक; 'हा' स्पर्धक जिंकणार ट्रॉफी!

सोशल मीडियावर युजर्सनी या घटनेवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मजेशीर कमेंट करत विचारले की, “विराट पुन्हा अल्गोरिदमलाच बिघडला का?” तर काहींनी अनुष्का शर्मा हिचा उल्लेख करत गंमतीदार प्रतिक्रिया करत म्हटले 'अनुष्का वहिनी काय सुरु आहे बघताय ना?'. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच लिजलैज हिने एका मुलाखतीत तिचा आवडता भारतीय क्रिकेटपटू म्हणून विराट कोहलीचे नाव घेतले होते. त्यामुळे आता विराटच्या ‘लाईक’मुळे चाहत्यांमध्ये अधिकच चर्चा रंगली आहे. काही युजर्सनी तर “विराटही तिचा चाहता दिसतोय” असेही म्हटले आहे.

Virat Kohli
Baseer Ali Controversy: 'बिग बॉस' फेम अभिनेत्याचे सोशल मीडिया अकांऊट हॅक; अभिनेत्याने 'त्या' पोस्टबाबत केला खुलासा

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर विराट कोहलीने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे हा ‘लाईक’ खरोखरच योगायोग होता की पुन्हा एकदा “अल्गोरिदम ग्लिच” यामागे आहे, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम आहे.

लिजलैज कोण आहे?

लिजलैज ही एक लोकप्रिय जर्मन-दक्षिण आफ्रिकन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर, गायिका आणि ट्रॅव्हल व्लॉगर आहे. ती भारतातील दैनंदिन जीवन, संस्कृती आणि प्रवासाच्या अनुभवांवर व्हिडिओ तयार करते; तसेच ती देशातील विविध शहरे आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा शोध घेते. इन्स्टाग्रामवर तिचे ४,२१,००० फॉलोअर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com